Simple Ultra Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही वाढती मागणी पाहता कंपन्या आपल्या नवनवीन EV गाड्या लॉन्च करत आहेत. आता याच यादीत बंगळुरूस्थित स्टार्टअप Simple Energy चेही नाव जोडले आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Simple Ultra’ लॉन्च केली आहे. या स्कूटरची खासियत म्हणजे, कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये तब्बल ४०० किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते.
जाणून घ्या किंमत आणि लॉन्च तारीख
मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत २.३५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, त्याची बुकिंग सुरू झाली आहे. कंपनी देशभरात आपले विक्री नेटवर्क वाढवण्यावरही भर देत आहे.
रेंज आणि बॅटरी
‘Simple Ultra’ मध्ये ६.५ kWh ड्युअल बॅटरी सिस्टम (५ + १.५ kWh) देण्यात आली आहे. ही बॅटरी स्कूटरच्या लोअर बॉडीमध्ये बसवण्यात आली असून, लांब अंतरासाठी स्थिर रायडिंग अनुभव देण्याचा दावा कंपनीने केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या स्कूटरची रेंज ४०० किमीपर्यंत आहे.
परफॉर्मन्स
या स्कूटरमध्ये ८.८ kW पीक पावर आणि ७२ Nm टॉर्क देणारी मोटर असून, याची टॉप स्पीड ११५ किमी/तास आहे. तसेच, ० ते ४० किमी/तास अंतर गाठण्यासाठी अवघे २.७७ सेकंद लागतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही त्यांच्या लाइनअपमधील दुसरी सर्वात वेगवान स्कूटर आहे.
डिझाइन आणि स्पेस
स्कूटरमध्ये स्टील ट्यूब्युलर चेसिस देण्यात आले आहे, ज्यामुळे बॅलन्स आणि कंट्रोल सुधारतो. याशिवाय, कॉपर-ऑरेंज फिनिशमुळे याला प्रीमियम लुक मिळतो. यात तुम्हाला २६ लिटर बूट स्पेसही मिळतो.
स्मार्ट फीचर्स
‘Simple Ultra’ स्कूटर स्मार्ट टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. यात ७ इंच TFT टचस्क्रीन, इन-बिल्ट नेव्हिगेशन, कॉल व म्युझिक कंट्रोल, मेसेज अलर्ट, लाइव्ह लोकेशन आणि ‘Find My Scooter’ सारखे फिचर्स मिळतात.
चार्जिंग आणि वॉरंटी
ही स्कूटर फास्ट चार्जरने अवघ्या तास १५ मिनिटांत ० ते ८०% चार्ज करता येते, तर होम चार्ज सुमारे ८.५ तास लागतात. सध्या भारतात कंपनीचे २५०+ फास्ट चार्जर नेटवर्क आहे. कंपनी या स्कूटरवर ३ वर्षे / ३०,००० किमीची वॉरंटी देत आहे, तर बॅटरी आणि मोटरवर ५ ते ८ वर्षांची वॉरंटी मिळतेय.
सेफ्टी फीचर्स
स्कूटरच्या सेफ्टीसाठी (रेन, रोड, रॅली, ट्रॅक) ४ ट्रॅक्शन मोड्स मिळतात. याशिवाय, ड्रॉप सेफ सिस्टम (पडल्यास मोटर बंद), अँटी-थेफ्ट आणि टो अलर्ट आणि क्रूझ कंट्रोल व हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स मिळतात.
Web Summary : Simple Energy launched the Ultra electric scooter, boasting a 400km range. Priced at ₹2.35 lakh, it features a dual battery, fast charging, and smart features. Sales network expanding across India.
Web Summary : सिंपल एनर्जी ने अल्ट्रा इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च की, जिसकी रेंज 400 किमी है। ₹2.35 लाख की कीमत वाली इस स्कूटर में डुअल बैटरी, फास्ट चार्जिंग और स्मार्ट फीचर्स हैं। भारत में बिक्री नेटवर्क का विस्तार हो रहा है।