मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही, असा स्पष्ट संदेश देत ईरानचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी देशाच्या अणुकार्यक्रमाला ‘स्वतंत्र तांत्रिक हक्क’ असल्याचे ठामपणे सांगितले आहे. या वक्तव्यामुळे अमेरिका-ईरान संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
“अणुकार्यक्रम थांबवायचा कोणत्या गुन्ह्यासाठी?”
राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केला. “इराणने कोणता गुन्हा केला आहे, ज्यासाठी आम्हाला आमचा अणुकार्यक्रम थांबवावा लागेल?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी पुढे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधत, “ते कोण आहेत आम्हाला आमचे अधिकार नाकारायला?” अशी टीका केली.
अमेरिकेचा दबाव, पण इराण झुकणार नाही
अमेरिका सातत्याने इराणवर अणुकार्यक्रम थांबवण्याचा दबाव टाकत आहे. मात्र, इराणने हा कार्यक्रम पूर्णपणे कायदेशीर आणि देशाच्या सार्वभौम अधिकाराचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. इराणी नेतृत्वाने आता ठाम भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम बंद केला जाणार नाही, असे संकेत दिले आहेत.
मध्यपूर्वेत वाढतंय तणावाचं सावट
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून खाडी देशांपर्यंत त्याचे पडसाद उमटत आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तात्पुरती युद्धविरामासारखी स्थिती असली तरी ती अत्यंत नाजूक मानली जात आहे.
होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा केंद्रस्थानी
इराण पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात हालचाली वाढवल्या आहेत. या मार्गावरून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होते. त्यामुळे येथील कोणतीही घडामोड जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकते. अमेरिकेनेही या परिस्थितीवर लक्ष ठेवून कडक इशारे दिले आहेत.इराण आणि अमेरिका यांच्यातील हा वाद केवळ अणुकार्यक्रमापुरता मर्यादित नसून तो जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनत आहे.
Web Summary : Iran asserts its right to a nuclear program, defying US pressure. President Pezeshkian challenges America's justification, questioning Trump's authority. Tensions escalate in the Middle East as Iran strengthens its stance, raising global concerns.
Web Summary : ईरान ने अमेरिकी दबाव को नकारते हुए परमाणु कार्यक्रम पर अपना अधिकार जताया। राष्ट्रपति पेज़ेश्कियान ने अमेरिका के औचित्य पर सवाल उठाते हुए ट्रंप के अधिकार पर प्रश्नचिह्न लगाया। ईरान के रुख से मध्य पूर्व में तनाव बढ़ गया है।