Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय

Ajit Agarkar Head Selector Team India: तीन वर्षांच्या कार्यकाळात काही धाडसी निर्णय घेतल्याने कराराचे नुतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:26 IST

Open in App

Ajit Agarkar Head Selector Team India: आगामी २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता बीसीसीआयनेअजित आगरकरचा टीम इंडियाच्या वरिष्ठ संघाचे मुख्य निवडकर्तेपदाचा करार आणखी एका वर्षासाठी नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगरकर २०२७ पर्यंत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कायम राहील. आगरकरच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२६ दरम्यान भारतीय संघाने चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यापैकी तीन स्पर्धा जिंकल्या. त्यात दोन टी२० विश्वचषक आणि एक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश होता. त्यामुळे त्याचा करार चौथ्या वर्षासाठी नूतनीकरण केला गेला आहे.

आगरकरबद्दल बीसीसीआयचे म्हणणे काय?

"आगरकरने मुदतवाढीची मागणी केली नव्हती. पण एक निवडकर्ता कनिष्ठ किंवा वरिष्ठ निवड समितीत चार वर्षांपर्यंत आणि दोन्ही समित्यांमध्ये मिळून एकूण पाच वर्षांपर्यंत काम करू शकतो. त्यामुळे अजित आगरकरच्या कराराचे नूतनीकरण केले जात आहे. ही मुदतवाढ (Extension) नाही तर नुतनीकरण (Renew) आहे," असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले.

आगरकर यांना कायम ठेवण्याचा निर्णय का घेतला?

अजित आगरकरच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की, आगरकरने स्वतः नूतनीकरणाची मागणी करण्याऐवजी निर्णय घेणाऱ्यांना आपल्या समितीच्या कामगिरीचे मूल्यांकन करू देणे पसंत केले. ५० षटकांच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघात सातत्य राखणे, हा मंडळाच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच त्याच्या कार्यकाळात, समितीने अनेक कठोर निर्णय घेतले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीवर देखरेख ठेवणे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हळूहळू बाहेर काढणे यांचा यात समावेश आहे. या निर्णयांवर टीका झाली. पण काही निर्णयांची मात्र वाहवा करण्यात आली.

धाडसी निर्णयांमुळे मिळाले समर्थन

या समितीने काही धाडसी निर्णयही घेतले. कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला टी२० विश्वचषक संघातून वगळून त्याच्या जागी फॉर्मात असलेल्या इशान किशनला संधी देण्यात आली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीला सातत्याने संधी देत राहिले. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवला टी२० संघाचे कर्णधारपद देण्यावर अजित आगरकर ठाम राहिला. अशा काही चौकटीबाहेरच्या पण संघाला फायदा होणाऱ्या निर्णयामुळे आगरकरला आणखी एक वर्ष त्याच्या पदावर कायम राहता येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Agarkar to remain Team India's chief selector until 2027.

Web Summary : BCCI extends Ajit Agarkar's tenure as chief selector until 2027, considering the upcoming World Cup. During his tenure, India reached four ICC finals, winning three. His bold decisions and focus on team consistency led to his renewal.
टॅग्स :अजित आगरकरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ