सूत जुळलं! काकीचं पुतण्यावर प्रेम जडलं; 'व्हॅलेंटाईन डे'ला नवरा आणि गावासमोर थेट लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:57 IST2026-02-17T12:56:33+5:302026-02-17T12:57:33+5:30
काकू आणि पुतण्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी नवं वळण घेतलं.

फोटो - ABP News
बागपतच्या टिकरी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. काकू आणि पुतण्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी असं वळण घेतलं की, दोघांनीही समाज आणि नात्याच्या सीमा ओलांडून एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारलं.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण प्रकार महिलेचा पती आणि इतर लोकांच्या उपस्थितीत घडला. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घालून सर्वांसमोर आपल्या नात्याची कबुली दिली. यानंतर दोघेही गावातून निघून गेले. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी समोर आलेलं हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा, वादाचा आणि आश्चर्याचा विषय बनलं असून लोक यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ येथील रहिवासी असलेल्या पूजाचं लग्न आठ वर्षांपूर्वी दोघट पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या टिकरी गावातील पंकज नावाच्या तरुणाशी झाला होता. या दाम्पत्याला तीन आणि पाच वर्षांची दोन मुलंही आहेत. पूजाचे गेल्या पाच वर्षांपासून दीराचा मुलगा संजीव याच्याशी प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब समजल्यानंतर पती आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी दोघांना समजावून सांगून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं प्रेम अधिकच वाढत गेलं.
पूजा, पंकज, संजीव आणि गावातील काही प्रतिष्ठित लोक दोघट पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे चर्चा झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेरच पूजा आणि संजीवने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं की, "आम्ही आमच्या इच्छेनुसार घर आणि गाव सोडून बाहेर जात आहोत." त्यानंतर पूजा आणि संजीवने एकमेकांच्या गळ्यात हार घालून एकमेकांचा स्वीकार केला. विशेष म्हणजे, यावेळी पूजाचा पती पंकज याने कोणताही विरोध केला नाही. महिलेच्या माहेरच्या लोकांनी घटनास्थळी येण्यास नकार दिला.