अनिल अंबानींच्या मुलाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 08:30 IST2026-03-15T08:29:25+5:302026-03-15T08:30:01+5:30
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे (आरएचएफएल) माजी संचालक जय यांची सीबीआयच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरएचएफएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सुधाकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे.

अनिल अंबानींच्या मुलाची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी; प्रकरण काय?
नवी दिल्ली : युनियन बँक ऑफ इंडियाशी संबंधित २२८ कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांची सुमारे पाच तास चौकशी केली.
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे (आरएचएफएल) माजी संचालक जय यांची सीबीआयच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरएचएफएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सुधाकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल आहे.
कर्जाची परतफेड नाही
सीबीआयने ९ डिसेंबर २०२५ रोजी जय यांच्या निवासस्थानी झडती घेतली. युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीआधारे सीबीआयने ही कारवाई केली होती. कंपनीने कर्जाची परतफेड केली नसल्याने २०१९ मध्ये हे खाते एनपीए म्हणून घोषित केले होते. यात बँकेचे २२८.०६ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सीबीआयने म्हटले.
आरएचएफएलने युनियन बँक ऑफ इंडियासह १८ बँका, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग कंपन्यांसह काही काॅर्पोरेट संस्थांकडून ५,५७२.३५ कोटी कर्ज घेतले होते, असे सीबीआयचे म्हणणे आहे.