शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:48 IST

हा अपघा कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरू गावाजवळ घडला. या अपघातात एक दुचाकी बसखाली आली आणि काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळे तिचा इंधन टँक फुटला आणि बसने पेट घेतला.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघाताची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळेच बंगळुरूकडे जाणाऱ्या या बसला आग लागल्याचे या तपासातून समोर आले आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला होता. 

हा अपघा कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरू गावाजवळ घडला. या अपघातात एक दुचाकी बसखाली आली आणि काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळे तिचा इंधन टँक फुटला आणि बसने पेट घेतला. बसमधील ४४ प्रवाशांपैकी १९ जणांचा जळून मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांना बसबाहेर पडण्यात यश आले होते.

काय म्हणाले डीआयजी?कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकतीच फॉरेन्सिक पुष्टी मिळाली आहे की, दुचाकीस्वार दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत होते." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीची फॉरेन्सिक पुष्टी होण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबरच्या पहाटे २ वाजता शंकर आणि एरी स्वामी हे लक्ष्मीपुरम गावातून तुग्गली गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी एका ढाब्यावर जेवण केले होते. जेथे स्वामीने दारू प्याल्याचे कबूल केले आहे.

नशेत असताना अपघात -कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल भरल्यानंतर शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत होता. थोड्याच वेळात त्यांची दुचाकी घसरली आणि शंकर उजव्या बाजूला पडून डिव्हाईडरला धडकला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

...अन् बसने पेट घेतला -शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिस