जगातील सर्वच देश आपली संरक्षण शक्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असततात. यात भारतही मागे नाही. भारताच्या सीमा अधिक बळकट करण्यासाठी, आता DRDO 'अग्नी-६' या पुढच्या पिढीतील सर्वात घातक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी सज्ज झाले आहे. हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असेल. आता केवळ भारत सरकारच्या हिरव्या झेड्याचीच प्रतीक्षा आहे. महत्वाचे म्हणजे, यामुळे भारताची जागतिक सामरिक शक्ती अधिक वाढेल.
अमेरिकेसह युरोपही टप्प्यात? -तज्ज्ञांच्या मते, 'अग्नी-६' ची रेंज ८००० ते १२००० किलोमीटर अथवा याहूनही अधिक असू शकते. ही या क्षेपणास्त्राची सर्वात मोठी ताकद आहे. या प्रचंड रेन्जमुळे भारत आपल्या भूमीवरूनच आशिया, चीन, रशिया आणि युरोपसह उत्तर अमेरिकेतील अलास्का आणि कॅनडासारख्या दूरवरच्या प्रदेशांनाही लक्ष्य करू शकेल. महत्वाचे म्हणजे, तांत्रिकदृष्ट्या हे क्षेपणास्त्र अग्नी-५ पेक्षाही अधिक प्रगत आणि घातक असू शकते.
MIRV तंत्रज्ञानामुळे अभेद्य - 'एमआयआरव्ही' (MIRV) हे एक अत्यंत विशेष तंत्रज्ञान आहे. या एकाच मिसाईलमधून एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे अथवा शस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूकपणे डागली जाऊ शकतात. यामुळे शत्रूची कोणतीही आधुनिक 'मिसाईल डिफेन्स सिस्टम' याला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरेल.
जमिनीबरोबरच समुद्रातूनही पलटवार -अग्नी-६ ला मोबाईल लाँचरसह अणू पाणबुड्यांतूनही डागले जाऊ शकेल. यामुळे भारताची 'न्यूक्लियर ट्रायड' क्षमता अधिक मजबूत होईल. जर शत्रूने भारताच्या जमिनीवरील तळांवर हल्ले केले, तरी भारत खोल समुद्रातून घातक पलटवार करू शकेल. याशिवाय, DRDO हायपरसोनिक तंत्रज्ञानावरही काम करत आहे. विशेष म्हणजे, अग्नी-६ मुळे भारताचे 'नो फर्स्ट युज' धोरणगी अधिक प्रभावी होईल.
Web Summary : India's Agni-6, a next-gen intercontinental ballistic missile, is nearing readiness. With a range of 8000-12000km, it can target Asia, Europe, and even parts of North America. Featuring MIRV technology, it can launch multiple warheads, enhancing India's nuclear deterrence from land and sea.
Web Summary : भारत की अगली पीढ़ी की अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक मिसाइल अग्नि-6 जल्द ही तैयार हो रही है। 8000-12000 किमी की रेंज के साथ, यह एशिया, यूरोप और उत्तरी अमेरिका के कुछ हिस्सों को भी निशाना बना सकती है। एमआईआरवी तकनीक से लैस, यह कई हथियार लॉन्च कर सकती है, जिससे भारत की परमाणु प्रतिरोधक क्षमता मजबूत होगी।