शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 22:14 IST

US-Iran War Update: युद्धविरामामुळे संघर्ष थांबला असला तरी इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडासह आजूबाजूच्या भागात अमेरिकन नौदलाने तगडी नाकेबंदी केली आहे.

 अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या सैनिकी कारवाईला आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्धविरामामुळे दोन्ही बाजूंनी संघर्षाला अर्धविराम मिळाला असला तरी आखातामधील तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. त्यातच युद्धविरामामुळे संघर्ष थांबला असला तरी इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडासह आजूबाजूच्या भागात अमेरिकन नौदलाने तगडी नाकेबंदी केली आहे. या नाकेबंदीमुळे इराणकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या निर्यातीला मोठा धक्का बसला आहे. एवढचं नाही तर अमेरिकेने केलेल्या या कोंडीमुळे इराणकडून तेलाची मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करणाऱ्या चीनचीही कोंडी झाली आहे. 

अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे निर्यात ठप्प झाल्याने इराणकडील खनिज तेलाच्या साठवणुकीची जागा संपत चालली आहे. नाकेबंदीदरम्यान अमेरिकन नौदल इराणी टँकरांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करून इतर देशांमध्ये जाऊ देत नसल्याने तेल टँकरांमध्येही खनिज तेल साठून आहे. मात्र काही तेलवाहू जहाजे आपली ट्रॅकिंग सिस्टिम बंद करून मार्गाक्रमण करत आहेत. त्यामुळे इराण चीनला किती तेलपुरवठा करत आहे, याची अचूक माहिती मिळणे कठीण झाले आहे.

चीन इराणकडून दररोज १३ ते १४ लाख बॅरल खनिज तेलाची खरेदी करतो. इराण आपल्या एकूण तेलाच्या निर्यातीपैकी तब्बल ८० ते ९० टक्के निर्यात ही चीनला करतो. मात्र अमेरिकेने  केलेल्या नाकेबंदीमुळे हे तेल चीनपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे चीनच्याही अडचणीत वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या वाहतुकीचं विश्लेषण करणारी संस्था असलेल्या वोर्टेक्साने दिलेल्या माहितीनुसार १३ ते २५ एप्रिलदरम्यान ओमानच्या आखातामधून इराणकडील खनिज तेलाची वाहतूक करणारे केवळ काही टँकरच बाहेर पडू शकले आहेत. हे प्रमाण मार्चमध्ये झालेल्या वाहतुकीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी कमी आहे. मार्चमध्ये इराणने २.३४ कोटी बॅरल तेलाची निर्यात केली होती.

दरम्यान, इराणच्या बंदरांमधून निघालेल्या अनेक जहाजांना अमेरिकन नौदलाने रोखले आहे. त्याशिवाय आशियाई सागरी क्षेत्रामध्येही कंटेनर वाहून नेणारी जहाजे आणि इराणी टँकर्सना अमेरिकेकडून लक्ष्य केले जात आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : US blockade traps Iranian tankers, China faces oil import issues.

Web Summary : American naval blockade of Iran disrupts oil exports, impacting China's imports. Iranian oil tankers are stuck, facing storage limits. China's oil supply lines are strained, affecting daily imports. Tanker tracking is obscured.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited Statesअमेरिकाchinaचीन