भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च २०२६ रोजी संपलेल्या सहा महिन्यांमध्ये आपल्या सोन्याच्या साठ्यामधील १०४.२३ मेट्रिक टन सोनं देशात स्थलांतरीत केलं आहे. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँकेच्या एकूण गोल्ड रिझर्व्हमध्ये किंचित वाढ झाली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेकडे सप्टेंबर २०२५ रोजी असलेला ८८०.१८ मेट्रिक टन सोन्याचा साठा वाढून मार्च २०२६ मध्ये ८८०.५२ टन एवढा झाला आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने सांगितले होते की, २९०.३७ मेट्रिक टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बीआयएसकडे होतं. तसेच १३.९९ मेट्रिक टन सोनं गोल्ड डिपॉझिटच्या रूपात ठेवलं होतं. सोन्याच्या किमतीमध्ये तेजी आल्याने भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याची भागीदारी वाढून मार्चमध्ये ती १६.७ टक्के एवढी झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ही भागीदारी १३.९२ टक्के होती.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने मागच्या सहा महिन्यांमध्ये परदेशात ठेवलेल्या सोन्याच्या साठ्यांपैकी १०४ मेट्रिक टनपेक्षा अधिक सोनं माघारी आणलं आहे. हे पाऊल बदलेली भूराजकीय परिस्थिती, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक बाजारामध्ये सुरू असलेले चढऊतार यादरम्यान देशांतर्गत पातळीवरील सोन्याचे साठे अधिक भक्कम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Web Summary : RBI brought back over 100 metric tons of gold to strengthen domestic reserves amid geopolitical uncertainty and fluctuating global markets. India's gold reserves increased slightly, enhancing foreign exchange reserves to 16.7% due to rising gold prices.
Web Summary : आरबीआई ने भू-राजनीतिक अनिश्चितता और अस्थिर वैश्विक बाजारों के बीच घरेलू भंडार को मजबूत करने के लिए लंदन से 100 मेट्रिक टन से अधिक सोना वापस मंगवाया। सोने की कीमतों में वृद्धि के कारण भारत का स्वर्ण भंडार थोड़ा बढ़ा और विदेशी मुद्रा भंडार 16.7% तक बढ़ गया।