जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 19:12 IST2024-07-14T19:12:07+5:302024-07-14T19:12:27+5:30

मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

Anant Radhika Wedding : World's Most Expensive Wedding; How much was spent on Anantha-Radhika's wedding? Find out | जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या...

जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या...

Mukesh Ambani : शुक्रवारी,12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह बंधनात अडकले. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेरेमनीपासून या शाही लग्नाची सुरुवात झाली. अजूनही या लग्नाचे काही कार्यक्रम बाकी आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. 

मागील अनेक दिवसांपासून या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या लग्नात विदेशातील अनेक कलाकारांनी परफॉर्म केले आहे. यासाठी त्यांना दिलेल्या पैशाचीही बरीच चर्चा सुरू आहे. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नावर अंदाजे 5000 कोटी रुपये खर्च केले आहेत. याहून चकीत करणारी बाब म्हणजे, ही रक्कम मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या फक्त 0.5 टक्के आहे. 

जगातील सर्वात महागडे लग्न
या आकड्याने राजकुमारी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या 1,361 कोटी रुपये आणि शेखा हिंद बिंत बिन मकतूम आणि शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या 1,144 कोटी रुपयांच्या प्रतिष्ठित विवाहांच्या खर्चालाही मागे टाकले आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये याची गणना केली जात आहे. विशेष म्हणजे, लग्नापूर्वी आयोजित कार्यक्रमांवर 2500 कोटी रुपये खर्च करण्यात केल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

देश-विदेशातील अनेकांची हजेरी
अनंत आणि राधिका यांच्या लग्नाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या शाही सोहळ्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. किम कार्दशियन, जॉन सिना आणि ॲडेल, जस्टीन बिबर यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींमुळे हा लग्नसोहळा आणखीनच आकर्षक बनला. 

दोनदा ग्रँड प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन
मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. या शाही उत्सवाची सुरुवात मार्चमध्ये जामनगरमध्ये आयोजित तीन दिवसीय प्री-वेडिंग पार्टीने झाली. रिहाना, एकॉन आणि दिलजीत दोसांझसारख्या कलाकारांनी त्यात परफॉर्म केले. तर, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे अब्जाधीशही त्यात सहभागी झाले होते. यानंतर, जूनमध्ये इटली ते फ्रान्स या लक्झरी क्रूझवर दुसरा प्री-वेडिंग सोहला आयोजित करण्यात आला. त्यात, कॅटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईजसारखे कलाकार सामील झाले.

Web Title: Anant Radhika Wedding : World's Most Expensive Wedding; How much was spent on Anantha-Radhika's wedding? Find out