शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:09 IST

Dr. Anjali Nimbalkar: गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्या विमानामधून प्रवास करत असलेल्या एका अमेरिकन महिलेचे काँग्रेसच्या महिला नेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे.

गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्याविमानामधून प्रवास करत असलेल्या एका अमेरिकन महिलेचे काँग्रेसच्या महिला नेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे. डॉ. अंजली निंबाळकर असं या प्रसंगावधान दाखवून वेळीच मदत करणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्याचं नाव असून. त्या कर्नाटक विधानसभेतील खानापूर मतदारसंघातील माजी आमदार आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार  शनिवारी दुपारी गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्याविमानाने उड्डाण केल्यानंतर दहा मिनिटांनी जेनी नावाच्या एका ३४ वर्षीय अमेरिकन महिलेला अस्वस्थ वाटू लागले. ती तिच्या बहिणीसोबत दिल्लीत एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी जात होती. दरम्यान, अचानक तिची प्रकृती बिघडू लागली आणि काही मिनिटांतच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.

या विमानातून कर्नाटकमधील काँग्रेसच्या माजी आमदा डॉ. अंजली निंबाळकर ह्या प्रवास करत होत्या. राजकारणात येण्यापूर्वी त्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी या अमेरिकन महिलेची स्थिती पाहिली आणि त्वरित आपल्या सीटवरून उठून परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.  डॉ. अंजली निंबाळकर यांनी या महिलेला त्वरित सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांनी जेनी हिला शुद्धीवर आणण्यासाठी आपलं सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ. अंजली यांच्या प्रयत्नांमुळे जेनी शुद्धीवर आली.

जेनीची प्रकृती स्थिरस्थावर झाल्याचे पाहिल्यावर डॉ. अंजली निंबाळकर आपल्या सीटवर जाऊन बसल्या. मात्र ३० मिनिटांनंतर जेनी हिची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली.  त्यानंतर डॉ. अंजली निंबाळकर या त्वरित मदतीस धावल्या. त्यांनी जेनी हिची प्रकृती स्थिर राखण्यासाठी मदत केली. दरम्यान, घाबरलेल्या जेनी हिने ‘तुम्ही कुठेही जाऊ नका’, असे डॉ. निंबाळकर यांचा हात पकडून सांगितले.

त्यानंतर डॉ. निंबाळकर संपूर्ण प्रवासात जेनी हिच्यासोबत राहिल्या. केबीन क्रूने मुख्य वैमानिकांना या मेडिकल एमर्जन्सीबाबत कल्ना दिली. त्यानंतर दिल्लीमध्ये या विमानाला प्राधान्यक्रम देऊन उतरवण्यात आले. तसेच जेनी हिला तातडीने अधिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अमेरिकेतील या महिलेचे प्राण वाचले. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनीही डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.  

टॅग्स :airplaneविमानIndigoइंडिगोcongressकाँग्रेसMLAआमदार