सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 11:14 IST2023-11-07T11:14:22+5:302023-11-07T11:14:47+5:30

वरुण गांधी हे त्यांच्या कुटुंबासोबत केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी हेलिकॉप्टरने केदारनाथहून डेहराडूनला रवाना झाले. 

All raised eyebrows! Rahul Gandhi, Varun Gandhi visit Kedarnath at the same time; met each other? | सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. एकमेकांचे पक्के हाडवैरी कधी एकमेकांचे सगे होतील आणि सगे एकमेकांचे कधी हाडवैरी होतील हे राजकारणच सांगू शकेल. असेच दोन चुलत भाऊ, जे राजकारणामुळे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि भाजपाचे नेते वरुण गांधी आज एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शवनाला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

राहुल गांधी आणि वरुण गांधी आज सकाळीच केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी गेल्या तीन दिवसांपासून उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते केदारनाथला आले होते. आज पहाटेच त्यांनी दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला रवाना झाले. परंतू, तेवढ्यात वरुण गांधी देखील दर्शनाला आले. 

या दोन भावांची भेट झाली की नाही याची स्पष्ट माहिती नाहीय. परंतू, जागरणच्या दाव्यानुसार राहुल गांधी हे वरुण यांना भेटण्यासाठी गेले होते, या दोघांची काही काळ भेट झाल्याचे म्हटले आहे. तर आजतकने राहुल गांधी निघाले आणि वरुण गांधी आले असे म्हटले आहे. या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचे म्हटले आहे.

वरुण गांधी हे त्यांच्या कुटुंबासोबत केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी हेलिकॉप्टरने केदारनाथहून डेहराडूनला रवाना झाले. 
 

Web Title: All raised eyebrows! Rahul Gandhi, Varun Gandhi visit Kedarnath at the same time; met each other?