Air India Plane Crash in kozhikode how more than 150 people life saved both pilots killed | Air India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव 

Air India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव 

ठळक मुद्देकोझिकोड विमानतळावर टेबल टॉप धावपट्टी आहे. म्हणजे, धावपट्टीच्या आजुबाजूला खोल दरी असते.पायलट दीपक वसंत साठे यांच्या अनुभवामुळे मोठी हानी टळली.2010 मध्येही मेंगळुरूला असाच अपघात झाला होता. यात तब्बल 160 लोकांचा मृत्यू झाला होता.

कोझिकोड - केरळमधील कोझिकोड विमानतळावर (Kozhikode Airport) दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. (Air India Plane Crash) या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. यात दोन वैमानिकांचा समावेश असून 100 वर लोक जखमी झाले आहेत. या विमानात एकूण 190 प्रवासी होते. हे विमान धावपट्टीवरून घसरून 35 फूट दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातेचे चित्र कुणाच्याही मनात धडकी भरवणारे आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव वाचला. (Air India Plane Crash)

यामुळे वाचला लोकांचा जीव अन् टळली मोठी हानी?
हे विमान सायंकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी कोझिकोडच्या धावपट्टीवरून घसरले. कोझिकोड एअरपोर्टवरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेथे गेल्या काही तासांपासून पाऊस सुरू होता. असे असताना वैमानिक कॅप्टन वसंत साठे यांनी एअरपोर्टला दोन चक्कर मारल्यानंतर धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. साठे हे हवाई दलाचे अनुभवी पायलट होते. तेथे त्यांना सोर्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या प्रयत्नाच्या वेळी कॅप्टन साठे यांना हे अवघड काम वाटले. अशात विमान लँड करण्या ऐवजी त्यांनी ते पुन्हा आकाशात नेले. यानंतर त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विमान रनवेवर उतरवले. मात्र तेथे पाणी साचले असल्याने विमान जेथे थांबायला हवे होते, तेथे न थांबता ते धावपट्टीहून पुढे जाऊन दरीत कोसळले आणि तेथे त्याचे दोन तुकडे झाले. शक्यतो अशा भीषण अपघातातून कुणाचीही वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. मात्र, या अपघातात विमानातील 190 लोकांपैकी केवळ 21 लाकांचाच मृत्यू झाल्याचे समजते. तर इतर 150 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

असाच अपघात मेंगळुरूलाही झाला होता -
कोझिकोड विमानतळावर टेबल टॉप धावपट्टी आहे. म्हणजे, धावपट्टीच्या आजुबाजूला खोल दरी असते. पाहाडांना कापून अशा प्रकारच्या धावपट्ट्या तयार केल्या जातात. अशा प्रकारच्या धावपट्ट्यांवर विनान उतरवणे पायलटसाठी मोठे आव्हान असते. 2010 मध्येही मेंगळुरूला असाच अपघात झाला होता. यात तब्बल 160 लोकांचा मृत्यू झाला होता. तेथेही अशीच टेबल टॉप धावपट्टी आहे.

कोझिकोड एअरपोर्टवरील धावपट्टीची लांबी 2860 मीटर एवढी आहे. अर्थात मेंगळुरूपेक्षा जवळपास 400 मीटर अधिक. त्यामुळे कदचित अधिक भीषण अपघात घडला नाही. म्हणून या अपघातात 150 हून अधिक लोकांचा जीव वाचला.

अनुभवी पायलट -
या अपघातात दोन्ही पायलट कॅप्टन वसंत साठे आणि अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. पायलट दीपक वसंत साठे यांच्या अनुभवामुळे मोठी हानी टळली. साठे एअफोर्समध्ये विंग कमांडर होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोझिकोड सेक्टरमध्ये विमान उडविण्याचा मोठा अनुभव होता. कॅप्‍टन साठे यांना 'Sword of honor' नेही सन्मानित करण्यात आले होते. वातावरण खराब असल्याने साठे यांनी धावपट्टीवर दोन चकरा मारल्या. यानंतर त्यांनी विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या विमानाला आग लागली नाही.

विमान क्रॅश होताच विमानातील इंधन लीक व्हायला सुरुवात झाली. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनलाही थोडा वेळ झाला. दिलासादायक गोष्ट म्हणजे, धावपट्टीवरच इंधल लीक झाल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले आणि सर्वात प्रथम हे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे केले नसते तर विमानाला आग लागण्याचीही शक्यता होती. सर्वसाधारणपणे कुठल्याही विमान अपघातात विमानाला आग लागते. असे झाले असते, तर कुणालाही वाचवणे कठीन होते. मात्र अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे, असे घडले नाही.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Air India Plane Crash in kozhikode how more than 150 people life saved both pilots killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.