CoronaVirus Vaccine Marathi News russia to register first coronavirus vaccine on 12 august | CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

ठळक मुद्देबऱ्याच दिवसांपासून लोक ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा करत होते, त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे.उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.ग्रिडनेव यांनी उफा शहरात एका कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

मॉस्को : जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातच रशियातून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. बऱ्याच दिवसांपासून लोक ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा करत होते, त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे. हो, हे खरे आहे. आता रशिया 12 ऑगस्टला कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहे. 

उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, रशिया कोरोनावरील आपल्या पहिल्या लसीचे 12 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करणार आहे. ही लस, गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे तयार केली आहे.

सध्या, ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. हे परीक्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे. या लसीच्या सुरक्षितते बाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय पेशाचा आणि वरिष्ठ नागरिक लसीकरण करून घेणारे पहिले व्यक्ती असतील. ग्रिडनेव यांनी उफा शहरात एका कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

या लसीच्या ​​परीक्षणास 18 जूनला सुरूवात करण्यात आली होती. यात 38 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. या संर्व स्वयंसेवकांत रोगप्रतिकारशक्ती तयार झाली. यातील पहिल्या गटाला 15 जुलैला तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात आली होती. यापूर्वी ही लस 10 ऑगस्ट अथवा त्यापूर्वीच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : याच वर्षी 3 नोव्हेंबरपर्यंत तयार होऊ शकते अमेरिकन कोरोना लस, ट्रम्प म्हणाले... 

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Vaccine Marathi News russia to register first coronavirus vaccine on 12 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.