Corona Vaccine serum CEO adar poonawalla gets a front row seat to the global corona vaccine race | Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

ठळक मुद्देसीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे.प्रति मिनिट 500 डोस तयार करण्याचा दावा.ही कंपवी दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार करते.

पुणे - संपूर्ण जगात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. जगातील अनेक कंपन्या आता यावरील लस तयार करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. अशातच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार असल्याचा दावा केला आहे.

अदार पूनावाला म्हणाले, 'असे फार कमी लोक आहेत, जे एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी किमतीत कोरोना लसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतात. कोरोना लसीच्या पहिल्या खेपेसाठी मला देश-विदेशातून अनेक नेत्यांचे फोन येत आहेत. मला त्यांना समजून सांगावे लागत आहे, की मी तुम्हाला अशीच लस देऊ शकत नाही.'

प्रति मिनिट 500 डोस तयार करण्याचा दावा - 
ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तैयार करण्याच्या कामात लागलेल्या सीरम इंस्टिट्यूटने एप्रिल महिन्यातच उघडपणे लस तयार करण्याचा दावा केला होता. आता कंपनीत प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. मात्र ही लस किती मोठ्या प्रमाणावर तयार होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीची आवश्यकता भासणार आहे. अशात पूनावाला भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही विभागणी करू शकतात.

एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या कोरोना लसीच्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, एस्ट्राजेनेकाला ही लस तयार करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची साथ मिळाली आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाल म्हणाले, की त्यांना क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठी लवकरच लायसन मिळण्याची आशा आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यावरील मानवी चाचणीला सुरुवात करण्यात येईल.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी आहे. ही कंपवी दरवर्षी 1.5 अब्ज लसींचे डोस तयार करते. यात, पोलिओपासून ते मीझल्सपर्यंतच्या लसींचा समावेश आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने याच भारतीय कंपनीला आपली कोरोना लस तयार करण्यासाठी निवडले आहे. 

परवानगी मिळताच सुरू होणार परिक्षण -
सीईओ अदार पूनावाला म्हणाले, 'परवानगी मिळताच आम्ही लसीचे परीक्षण सुरू करू. याच बरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पानही सुरू करू.' याच महिन्या पुनावाला म्हणाले होते, की याच वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही लस तयार करू अशी आशा आहे. एवढेच नाही, तर घाई करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित लस तयार करणे, हा कंपनीचा उद्देश आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

अ‍ॅप्स, कॉन्ट्रॅक्ट्सनंतर चीनला आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी, आता 'या' विद्यापीठांवर सरकारची नजर

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccine serum CEO adar poonawalla gets a front row seat to the global corona vaccine race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.