शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:30 PM2020-07-31T17:30:47+5:302020-07-31T17:35:20+5:30

रक्षाबंधनाच्या वातावरणात या मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" सारखे गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला सर्वप्रथम राखी बांधली आणि नंतर त्यांना सांकेतिक पद्धतीने मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड करून आभार मानले. 

muslim women tied rakhi to pm modi in varanasi | शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

googlenewsNext
ठळक मुद्देया मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला राखी बांधली एका मुस्लीम महिलेने म्हटले आहे, पंतप्रधानांनी असेच त्यांचे संरक्षण करत राहावे.2019मध्ये पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच तीन तलाक विरोधात कायदा तयार केला.

वाराणसी - मोदी सरकारने एक वर्षापूर्वी, आजच्याच दिवशी  तीन तलाक सारख्या कुप्रथेला तिलांजली देणारा कायदा संमत केला. मुस्लीममहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे कार्य कशा विसरू शकातील? यामुळेच वाराणसी येथील मुस्लीममहिलांनी देशाचे पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत, त्यांच्या फोटोला राखी बांधून त्यांचे आभार मानले आहेत.

वाराणसीतील मुस्लीम बाहूल दालमंडी भागात मुस्लीम महिलांनी आपले खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे अनेख्या अंदाजात आभार मानले आहेत. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी मोदी सरकारने मुस्लीम महिलांसाठी कायदा तयार करून त्यांना तीन तलाक सारख्या कुप्रथेतून मुक्त केले होते. रक्षाबंधनाच्या वातावरणात या मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" सारखे गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला सर्वप्रथम राखी बांधली आणि नंतर त्यांना सांकेतिक पद्धतीने मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड करून आभार मानले. 

अलीमुनीसा सांगतात, तीन तलाकविरोधात कायदा तयार करून मोदींनी फार चांगले कार्य केले आहे. यामुळे आज त्यांना राखी बांधून वाराणसीतील मुस्लीम बहिणी त्यांचे आभार मानत आहेत. पंतप्रधानांनी असेच त्यांचे संरक्षण करत राहावे. आणखी एक महिला, सीमा बानो यांनी म्हटले आहे, की त्या पंतप्रधान मोदींना आपला भाऊ मानतात. रक्षाबंधना निमित्त राखी बांधून मिठाईही देत आहे. तीन तलाकविरोधात कायदा तयार केल्यामुळे आम्ही मुस्लीम बहिणी पंतप्रधान मोदींच्या ऋणी आहोत.

यावेळी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे वाराणसीचे महामंत्री शेख मो. आसिफ यांनी सांगितले, की 2014 मध्ये मोदी सत्तेत येताच त्यांनी तीन तलाकपासून मुस्लीम महिलांना मुक्त करणार असल्याचे म्हटले होते. राज्यसभेत बहुमत नसल्याने हे विधेयक लवकर पास होऊ शकले नाही. मात्र, 2019मध्ये पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच तीन तलाक विरोधात कायदा तयार केला. तेव्हाच देशातील मुस्लिमांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, यावेळी कोरोनामुळे मुस्लीम महिलांनी आपल्या मोदी भावाच्या फोटोलाच राखी बांधूनच त्यांचे तोंड गोड केले आणि आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

आनंद महिंद्रांनी मुंबईतल्या 'या' जोडप्याला डोनेट केले 4 लाख रुपये; कारण जाणून तूम्हीही कराल त्यांना सलाम

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

Web Title: muslim women tied rakhi to pm modi in varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.