मियां वादा : "तू 2 रुपये का भिखारी...!", ओवेसी यांचं वादग्रस्त विधान; कुणावर चढवला हल्ला, प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:38 IST2026-02-07T18:38:28+5:302026-02-07T18:38:50+5:30

तत्पूर्वी, हिंमता बिस्वा सरमा यांनी नुकतेच एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की आसाममधील 'मिया मुस्लीम' (बंगाली वंशाचे मुस्लीम) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानातील वस्तूंच्या किमती आणि रिक्षेचे भाडे कमी ठेवतात. सरमा यांनी याला 'आर्थिक जिहाद' आणि लोकसंख्या वाढीच्या कटाचा भाग म्हटले होते.

AIMIM Miyan issue asaduddin owaisi controversial statement about assam cm himanta biswa sarma calling beggar | मियां वादा : "तू 2 रुपये का भिखारी...!", ओवेसी यांचं वादग्रस्त विधान; कुणावर चढवला हल्ला, प्रकरण काय? 

मियां वादा : "तू 2 रुपये का भिखारी...!", ओवेसी यांचं वादग्रस्त विधान; कुणावर चढवला हल्ला, प्रकरण काय? 


एआयएमआयएम प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा जोरदार हल्ला चढवला आहे. ओवेसी यांनी सरमा यांचा उल्लेख '२ रुपयांचा भिकारी' असा करत तोफ डागली. ते निझामाबाद येथील एका निवडणूक सभेत बोलत होते.

काय आहे प्रकरण? -
यावेळी बोलताना ओवेसी यांनी भरसभेत लोकांकडून दोन रुपयांचे नाणे मागितले. ते नाणे दाकवत त्यांनी मुख्यमंत्र्यां हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी म्हणाले, "हे २ रुपये आहेत. आसामचा मुख्यमंत्री म्हणतोय, 'जर तेथील मिया मुस्लिमांनी रिक्षामध्ये कुणाला बसवले आणि भाडे ५ रुपये असेल, तर ४ रुपयेच द्या.' हिंमत बिस्वा सरमा, ही २ रुपयांची भीक मी तुला देत आहे. घेणार का?" पुढे ते म्हणाले, "तू २ रुपयांचा भिकारी आहेस. तू एवढा छोटा माणूस आहेस की, गरीब रिक्षाचावाल्यांच्या ४-५ रुपयांच्या मागे पडला आहेस"

तत्पूर्वी, हिंमता बिस्वा सरमा यांनी नुकतेच एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की आसाममधील 'मिया मुस्लीम' (बंगाली वंशाचे मुस्लीम) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानातील वस्तूंच्या किमती आणि रिक्षेचे भाडे कमी ठेवतात. सरमा यांनी याला 'आर्थिक जिहाद' आणि लोकसंख्या वाढीच्या कटाचा भाग म्हटले होते. यावर पलटवार करताना ओवैसी यांनी त्यांना 'गरीब विरोधी' म्हटले.

दरम्यान, आपण आपल्या समाजाचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ओवैसी यांचे हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

Web Title : ओवैसी ने असम के सीएम सरमा को '2 रुपये का भिखारी' कहा।

Web Summary : ओवैसी ने असम के मुख्यमंत्री सरमा की आलोचना करते हुए उन्हें '2 रुपये का भिखारी' कहा, क्योंकि उन्होंने 'मिया मुसलमानों' के बारे में टिप्पणी की थी। सरमा ने उन पर कीमतों और किराए को 'आर्थिक जिहाद' के रूप में कम करने का आरोप लगाया। ओवैसी ने अपने समुदाय का बचाव किया और सरमा के 'गरीब विरोधी' रुख की निंदा की।

Web Title : Owaisi calls Assam CM Sarma a '2-rupee beggar'.

Web Summary : Owaisi criticized Assam CM Sarma, calling him a '2-rupee beggar' for his remarks about 'Miya Muslims'. Sarma accused them of lowering prices and fares as 'economic jihad'. Owaisi defended his community and condemned Sarma's 'anti-poor' stance.