शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गजेंद्रच्या आत्महत्येनंतर भाषण सुरू ठेवून चूक केली - केजरीवाल

By admin | Updated: April 24, 2015 14:12 IST

किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २४ - किसान रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंगच्या आत्महत्येनंतर आपण आपले भाषण थांबवायला हवे होते असे सांगत आपली चूक झाल्याचे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केले. या घटनेबाबत दु:ख व्यक्त  करत यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण व आापला पक्ष तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गजेंद्रने गलफास लावून आयुष्य संपवल्यानंतरही मचावरून अरविंद केजरीवाल व इतर नेत्यांची भाषणं सुरू होती. त्यावरून गदारोळ माजलेला असतानाच आज केजरीवालांनी अखेर आपली चूक कबूल करत माफी मागितली. 'व्यासपीठापासून ते झाड अगदी जवळ होते, मात्र तेथे बॅनर्स लावलेले असल्याने तेथे काय सुरू आहे ते आम्हाला दिसत नव्हते. झाडाजवळ काहीतरी गडबड सुरू असल्याचे आम्हाला जाणवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. त्यावेळी  तेथे काही स्वयंसेवक आणि पोलिसही उपस्थि होते पण गजेंद्र सिंग खरंच आत्महत्या करेल असे कोणालाच वाटले नव्हते. मला मान्य आहे की आत्महत्येच्या घटनेनंतर मी बोलणे थांबवायला हवे होते, मी तसे केले नाही ही चूक झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता आपण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या का करत आहे यावर चर्चा करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  यावेळी त्यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी त्या शेतक-याच्या आत्महत्येच्या घटनेची चित्र दाखवली जात आहेत, त्याविषयी चर्चा केली जात आहे, हे योग्य नव्हे अशी टीका त्यांनी केली. तसेच ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली असून त्यादिवशी रात्रभर झोपू शकलो नसल्याचेही केजरीवाल पुढे म्हणाले.
दरम्यान असे वक्तव्य करत केजरीवाल राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला आहे.