गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवणे बेतले जिवावर; संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने केले ते धक्कादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:20 IST2024-04-23T13:19:39+5:302024-04-23T13:20:15+5:30

प्रेयसी नसल्याने दिशांत नेहमी डिवचायचा त्यामुळे आरोपी संतापला.

A minor has killed a friend who teased him for not having a girlfriend in Vadodara, Gujarat | गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवणे बेतले जिवावर; संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने केले ते धक्कादायक!

गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवणे बेतले जिवावर; संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने केले ते धक्कादायक!

राग हा क्षणिक असतो पण रागाच्या भरात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी नाही म्हणून डिवचणाऱ्या मित्राची हत्या करण्यात आली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. मित्र सतत प्रेयसी नसल्याचा टोला लगावत असल्याने संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने धक्कादायक कृत्य केले. मृत तरूण आरोपी तरूणाला तुला प्रेयसी नाही म्हणून डिवचायचा. यावरून अल्पवयीन आरोपी संतापला आणि आपल्या मित्राचाच जीव घेतला. 

आरोपी तरूणाने त्याचा मित्र दिशांक राजपूतला स्थानिक दिवालीपुरा परिसरात फिरण्यासाठी बोलावले होते. दिशांत त्याचा मित्र रंजीत माळीसोबत ठरलेल्या जागी पोहोचला. तिथे आरोपी देखील आपल्या सहकारी मित्रांसह आला होता. ते चौघे परिसरातील एका कॉलनीजवळ गेले, जिथे आरोपीने अचानक चाकू काढला आणि दिशांतवर हल्ला करण्यास सुरुवात केली. 

तरूणानं केलं ते धक्कादायक 
दिशांतची हत्या करून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन्ही आरोपींनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. हल्लेखोर तरूणासह इतर एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून चौकशी सुरू आहे. दिशांतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मित्रपरिवार मोठा आहे, ज्यामध्ये तरूणींची संख्या आहे. दिशांत आणि मृत तरूण एकाच ट्युशनमध्ये होते. तिथे मृत दिशांत आरोपी तरूणाला प्रेयसी नसल्यावरून सतत चिडवत असे.

दरम्यान, प्रेयसी नसल्याने दिशांत मुलींसमोर नेहमी डिवचायचा त्यामुळे आरोपी संतापला. केवळ या कारणावरून नाराज आरोपीने दिशांतचा काटा काढण्याचे ठरवले. दिशांतला धडा शिकवण्यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत योजना आखली अन् त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीसह एका मुलाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: A minor has killed a friend who teased him for not having a girlfriend in Vadodara, Gujarat