स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात

वयाच्या ३६व्या वर्षी घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:20 IST2026-04-16T10:19:40+5:302026-04-16T10:20:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bangladesh cricketer rubel hossain announces retirement He has been in jail on charges of abusing women | स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात

स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात

IPL 2026 हा सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय आहे. जगभरातील खेळाडूंच्या स्फोटक कामगिरीने सध्याच्या हंगामाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रिकेटच्या या उत्साहाच्या वातावरणात एका स्टार गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्याच्यावर एकेकाळी बलात्काराचे आरोप करण्यात आले होते, पण नंतर त्याच तरुणीने आरोप मागे घेतले. तब्बल ५००हून अधिक बळी घेणाऱ्या या गोलंदाजाचे नाव म्हणजे रुबेल होसेन. बांगलादेशच्या रुबेल होसेनने (Rubel Hossain Retirement) वयाच्या ३६व्या वर्षी आपल्या १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला आहे.

रुबेल होसेनची निवृत्ती, कशी होती क्रिकेट कारकीर्द?

रुबेल होसेनने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एप्रिल २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली, तरी त्याने आपला शेवटचा सामना एप्रिल २०२१ मध्ये ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तथापि, त्यानंतर झालेल्या दुखापतींमुळे तो क्रिकेटपासून दूर राहिला. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा सहभागही कमी होऊ लागला होता. त्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

१९३ आंतरराष्ट्रीय बळी

रुबेल होसेनने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण ५६९ बळी घेतले. त्यात ९७ प्रथम-श्रेणी, २८७ लिस्ट ए आणि १८५ टी२० बळींचा समावेश आहे. त्याने १५९ सामन्यांमध्ये १९३ आंतरराष्ट्रीय बळीही घेतले आहेत. रुबेल होसेन हा एकदिवसीय पदार्पणात चार बळी घेणारा पहिला बांग्लादेशी गोलंदाज आहे. बांग्लादेशी क्रिकेट चाहते त्याला २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याच्या कामगिरीसाठी नेहमीच लक्षात ठेवतील. त्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी दिली होती.

बलात्काराचे आरोप, नंतर खटला मागे

रुबेल होसेनवर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. दिग्गज बांग्लादेशी खेळाडू असूनही बलात्काराचे आरोप गांभीर्याने घेतल्याने त्याला तीन दिवस तुरुंगात काढावे लागले. जामिनावर सुटल्यानंतरच तो २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायला परतला. त्या विश्वचषकात त्याच्या कामगिरीने लोकांची मने जिंकली आणि त्याच्याबद्दलची धारणा बदलली.

Web Title : स्टार क्रिकेटर रुबेल हुसैन बलात्कार के आरोपों के बीच सेवानिवृत्त

Web Summary : बांग्लादेशी गेंदबाज रुबेल हुसैन, 36, 17 साल बाद सेवानिवृत्त हुए। कभी बलात्कार का आरोप लगा, आरोप हटाए गए। उन्होंने 193 अंतरराष्ट्रीय विकेट सहित 569 करियर विकेट लिए। 2015 विश्व कप में एक प्रमुख खिलाड़ी, उन्होंने विवादों को पार कर सफलता हासिल की।

Web Title : Star Cricketer Rubel Hossain Retires Amidst Past Rape Allegations

Web Summary : Bangladeshi bowler Rubel Hossain, 36, retires after 17 years. Once accused of rape, charges were dropped. He took 569 career wickets, including 193 international wickets. A key player in the 2015 World Cup, he overcame controversy to achieve success.