"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:44 IST2026-04-16T11:36:29+5:302026-04-16T11:44:18+5:30

मुंबईतील दादर येथे नारी शक्ती वंदन महिला संमेलनाचे आयोजन होताना दिसले. या प्रसंगी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले.

Prajakta Mali praised Chief Minister Devendra Fadnavis on his work on ashok kharat case | "त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक

"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी अनेकदा जाहीर व्यासपीठावर स्वतःचं मत मांडताना दिसते. प्राजक्ताने नुकत्याच एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं. मुंबईतील दादर येथे नारी शक्ती वंदन महिला संमेलनाचे आयोजन होताना दिसले. यावेळी प्राजक्ता माळी, रविना टंडन हे सेलिब्रिटी उपस्थित होते. या प्रसंगी प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले.

प्राजक्ता माळी म्हणते की, ''मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे जिथे बापाप्रमाणे कठाेर व्हायला पाहिजे तिथे कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे तिथे त्या पद्धतीने त्या गोष्टी हाताळतात.''

प्राजक्ता माळी पुढे म्हणते, ''त्याचबरोबर ते जेव्हा माईकवर बोलतात. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही. अहो चुकीचा शब्द सोडा त्यांचा सूर कधी ढळलेला मी पाहिला नाही.'', अशाप्रकारे प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे

Web Title : पराजक्ता माली ने 'भोंदू बाबा' मुद्दे को संवेदनशीलता से संभालने के लिए फडणवीस की सराहना की।

Web Summary : अभिनेत्री पराजक्ता माली ने 'भोंदू बाबा' मुद्दे को संवेदनशीलता से संभालने के लिए मुख्यमंत्री फडणवीस की सराहना की। उन्होंने उनके संतुलित दृष्टिकोण और आलोचना के बावजूद गरिमापूर्ण भाषण की प्रशंसा की।

Web Title : Prajakta Mali praises Fadnavis for handling 'Bhondu Baba' issue sensitively.

Web Summary : Actress Prajakta Mali lauded CM Fadnavis for his sensitive handling of the 'Bhondu Baba' issue. She praised his balanced approach and dignified speech despite criticism.