शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:51 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे.  उत्तर प्रदेश सरकारच्या  समाज कल्याण विभागाच्या मुख्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर समाजकल्याण मंत्री असीम अरुण यांनी ही कारवाई केली आहे. पीडित महिलेने  समाजकल्याणं मंत्र्यांचे खाजगी सचिव जयकिशन सिंह यांच्यावर छेडछाड आणि अश्लिल कृत्य केल्याचा आरोप केला होता. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर मंत्र्यांनी गोमतीनगरच्या एसएसओेंना बोलावून जयकिशन सिंह यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू आहे.

उत्तर प्रदेशमधील समाज कल्याण विभागाचं मुख्यालय असलेल्या भागीदारी भवनमध्ये सेवेत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने मंत्री असीम अरुण यांची भेट घेऊन तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच मंत्र्यांचे खाजगी सचिव जयकिशन सिंह हे दीर्घकाळापासून त्रास देत होते, तसेच आपल्यासोबत अश्लिल वर्तन करायचे, असे सांगितले. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्र्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.

माजी आयपीएस अधिकारी असलेल्या असीम अरुण यांनी आपल्या झीरो टॉलरन्स धोरणांतर्गत या प्रकरणी तात्काळ कारवाई केली. त्यांनी गोमतीनगर ठाण्याच्या एसएचओ यांना घटनास्थळी बोलावून जयकिशन सिंह यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश