८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:52 IST2026-05-05T13:51:23+5:302026-05-05T13:52:14+5:30

चेन्नई शहरात विविध विधानसभा मतदारसंघात एकूण ५३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील २० अपक्ष उमेदवार होत्या

8 months pregnant, campaigned from door to door; Today M R Pallavi from TVK became an MLA | ८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार

८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार

चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. चेन्नई शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५३ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. या ५३ पैकी केवळ दोन महिला उमेदवार विजयी झाल्या. त्या दोघीही टीवीके पक्षाच्या होत्या आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवत होत्या. यात सर्वाधिक चर्चा ३६ वर्षीय एम.आर पल्लवी यांची होत आहे. ज्या आठ महिन्यांची गर्भवती असताना ही राजकीय लढाई लढत होत्या. 

थिरू वी नगर विधानसभा जागेवर टीवीके उमेदवार एम.आर पल्लवी यांचा विजय झाला आहे. तर पल्लवरम येथून जे कामाक्षी यांनी विजय मिळवला. या दोन्ही महिला उमेदवार पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात होते. एम.आर पल्लवी २२ हजार ३३३ तर कामाक्षी यांनी ५४ हजार ६९३ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. चेन्नई शहरात विविध विधानसभा मतदारसंघात एकूण ५३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील २० अपक्ष उमेदवार होत्या. ३३ उमेदवार राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत होत्या. त्यात डिएमके २, एआयडिएमके ३, टीवीके २ आणि भाजपाकडून १२ जणी मैदानात होत्या. 

८ महिन्याच्या गर्भवतीचा घरोघरी प्रचार

एम आर पल्लवी यांच्या विजयानंतर टीवीके नेत्यांनी म्हटलं की, निवडणूक प्रचारावेळी पल्लवी यांनी घेतलेल्या मेहनतीने लोकांची मने जिंकली. त्या गर्भधारणेच्या अंतिम टप्प्यात होत्या. भीषण उन्हाळ्यातही त्या घरोघरी जात लोकांसोबत संपर्क ठेवत होत्या. प्रत्येकाशी त्या कनेक्ट होत्या. त्याचेच फळ निकालात मिळाले आहे असं त्यांनी सांगितले. तर आजपासूनच माझ्या कामाची सुरूवात झालीय. माझा मतदारसंघ मागे पडला आहे. इथे खूप काम करण्याची गरज आहे. ही माझ्यासाठी एक संधी आहे असं विजयी उमेदवार पल्लवी यांनी सांगितले.

बेशुद्ध झाली, पण हार मानली नाही 

हा त्यांचा हक्काचा विजय आहे.  पल्लवी यांना चालताना त्रास होत होता आणि डिहायड्रेशनमुळे त्या एकदा बेशुद्धही झाल्या होत्या. मतांसाठी प्रचार करत असताना, लोकांनी त्यांना ज्यूस दिला आणि घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या दृढनिश्चयामुळेच हा विजय झाला असं टीवीकेच्या युवा शाखेचे सचिव, जे. कार्तिक यांनी म्हटलं. 

दरम्यान, शहरात पराभूत झालेल्या महिला उमेदवारांमध्ये भाजपाच्या तेलंगणा आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन आणि एआयएडीएमकेच्या माजी मंत्री गोकुला इंदिरा व बी. वलारमथी यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता. डीएमकेच्या ए.पी. पूर्णिमा आणि आर.एस. कृतिका देवी यांसारख्या दोघीही डॉक्टर असलेल्या नवीन उमेदवारही पराभूत झाल्या. दिवंगत बसपा नेते आर्मस्ट्राँग यांच्या वकील पत्नी पोरकोडी आर्मस्ट्राँग यांचाही पराभव झाला.

Web Title : गर्भवती उम्मीदवार ने स्वास्थ्य चुनौतियों के बावजूद चुनाव जीता, प्रेरणादायक विजय

Web Summary : एम.आर. पल्लवी, आठ महीने की गर्भवती, ने स्वास्थ्य चुनौतियों का सामना करते हुए तमिलनाडु चुनाव जीता। बेहोश होने के बाद भी उनके घर-घर जाकर प्रचार ने मतदाताओं को प्रभावित किया। एक अन्य टीवीके उम्मीदवार, कामाक्षी ने भी जीत हासिल की, जिससे चुनाव में महिलाओं के लिए एक महत्वपूर्ण जीत हुई।

Web Title : Pregnant Candidate Wins Election Despite Health Challenges, Inspires Victory

Web Summary : M.R. Pallavi, eight months pregnant, won the Tamil Nadu election, defying health challenges. Her door-to-door campaigning, even after fainting, resonated with voters. Another TVK candidate, Kamakshi, also secured a victory, marking a significant win for women in the election.