शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 29, 2015 13:46 IST

मुद्रा' योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा झाला असून त्यात २४ लाख महिलांसह एससी,एसटी व ओबीसी गटातील लोकांचा समावेश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मुद्रा' योजनेसाठी सरकारचे कौतुक केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - 'मुद्रा' योजनेमुळे ६६ लाख लोकांचा फायदा झाला असून त्यात २४ लाख महिलांसह एससी,एसटी व ओबीसी गटातील लोकांचा समावेश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मुद्रा' योजनेसाठी सरकारचे कौतुक केले. ही योजना लागू होऊन अद्याप काही काळच झाला असला तरी कमी वेळात ६६ लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे, आत्तापर्यंत ४२ हजार कोटी रुपये लोकांमध्ये वाटण्यात आल्याचे मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमादरम्यान देशवासियांना सांगितले. दरम्यान या वेळी त्यांनी ' एक भारत, श्रेष्ठ भारत‘ या विचाराला योजनेमध्ये परावर्तित करायचे आहे असे सांगत मोदींनी या योजनेसाठी सूचना, कल्पना पाठवण्याचे आवाहन देशवासियांना केले. 
"मन की बात‘ या कार्यक्रमाच्या चौदाव्या भागाद्वारे मोदी यांनी  रविवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. देशातील विविध भागात गेल्या काही दिवसांत कमी-जास्त पाऊस झाला असून तामिळनाडूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नैसर्गिक संकट उद्‌भवल्याचे सांगत देशवासिय संकटग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारसह, नागरिक व अनेक संस्थांनी मोठी मदत केल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक अपंग दिन' सादरा करण्यात येणार आहे असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेले लोकही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात, असे मत व्यक्त केले. त्यांच्याकडे दयाभावनेने न पाहता पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर ते आपल्याला जगण्याची प्रेरणा देतात असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात त्यांनी १९९६ साली काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जावेद अहमदचे उदाहरणही मोदींनी दिले. हल्ल्यात जखमी झाल्याने पुढील आयुष्य समाजकार्यासाठी देण्याचा संकल्प अहमद यांनी केला आहे आणि त्यादृष्टिने ते कार्य करत आहेत, असे मोदी म्हणाले.