काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 05:01 IST2020-07-13T05:01:04+5:302020-07-13T05:01:31+5:30

रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

3 militants killed in Kashmir clashes | काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

काश्मिरातील चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह ३ अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी नागरिकासह लष्करे-तैयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांवर अलीकडच्या काळात झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या पाकिस्तानी नागरिकाचा हात होता.
रेबन भागात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून तेथे शनिवारी मध्यरात्रीपासून शोधसत्र हाती घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी पहाटे ४ वाजता अतिरेक्यांनी गोळीबार केल्यावर चकमकीला तोंड फुटले. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी नागरिकासह तीन अतिरेकी मारले गेले. दिवसभर ही कारवाई सुरू होती. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
सोपोरमध्ये सीआरपीएफ जवान शहीद झाला होता, तसेच एक नागरिक ठार झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्याचा हात होता, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली.

एलओसीवर मारा
पाकिस्तानी सैन्याने एलओसीवर जोरदार मारा केला. राजौरी व पूंछ जिल्ह्यातील या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

Web Title: 3 militants killed in Kashmir clashes