शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

२०... गुन्हे ... जोड

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
तरुणाचा मृत्यू : मौदा परिसरातील अपघात
मौदा : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा परिसरातील काच कंपनीजवळ गुरुवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.
रामप्रसाद सदाशिव बावनकुळे (३५, रा. नवेगाव, चिचघाट) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामप्रसाद हा एमएच-३६/टी-४२२२ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, काच कंपनीजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात तो खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
भेंडाळा येथे घरफोडी
सावनेर : खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा येथे घरफोडी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी उषा युवराज ठाकरे (४८, रा. भेंडाळा, ता. सावनेर) या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी कपाटातील १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख १७ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी खापा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
बुटीबोरी एमआयडीसीमध्ये चोरी
नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील कंपनीत चोरी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐेवज चोरून नेला.
फिर्यादी प्रसन्न चिंताननी पाटणकर (३४, रा. नागपूर) यांच्या मालकीची बुटीबोरी एमआयडीसी परिसरात र्फार्म फ्रेश फूड प्रोसेसिंग नामक कंपनी आहे. चोरट्यांनी या कंपनीच्या आवरात प्रवेश केला आणि तेथील कुलिंग सिस्टीम मशीन लंपास केली. या मशीनची किंमत ३ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***