शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक ऑडिट म्हणजे काय रे भाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:07 IST

नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय ...

ठळक मुद्देमनपाला प्रश्न : कधीच केली नाही तपासणी

नाशिक : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शासकीय-निमशासकीय रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची चर्चा होत असताना, जिल्हा शासकीय रुग्णालयापाठोपाठ नाशिक महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे असे ऑडिटच झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत.कोणत्याही इमारतीत ज्याप्रमाणे अग्निशमन प्रतिबंधक साधने आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फिटिंग्जही आवश्यक आहे. त्यानुसार, ठरावीक कालावधीनंतर इलेक्ट्रिक साधने तपासणी करणे आवश्यक आहे, परंतु नाशिक महापालिकाही पालक संस्था असताना, त्यांच्या गावीही हा विषय नाही. महापालिकेची बिटको आणि न्यू बिटको, त्याचबरोबर, जिल्हा पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय आणि कथडा येथील डॉ.झाकीर हुसेन रुग्णालये हे चार प्रमुख रुग्णालये आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्याच वर्षी शासनाच्या बांधकाम विभागाला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी कळवले होते. मात्र, बांधकाम विभागाने अद्याप ते केलेले नाही. नाशिक महापालिकेत मात्र वेगळी बाब आहे. या यंत्रणेचा स्वत:चा विद्युत विभाग आहे, परंतु तरीही अशाप्रकारचे इलेक्ट्रिक ऑडिट करावे लागते, याचा विचारही झालेला नाही.महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने गेल्याच वर्षी फायर ऑडिट करून घेतले आहेत. मात्र, इलेक्ट्रिक ऑडिटच केलेले नाही. विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले व अशा प्रकारचे ऑडिटबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे खासगी रुग्णालयांची फायर ऑडिटवरून अडवणूक करणारी महापालिका प्रत्यक्षात आपल्या रुग्णालयांच्या बाबतीत किती सजग आहे, हेच स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFire Brigadeअग्निशमन दल