शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया न करताच सांडपाणी गोदावरीत, पर्यावरणप्रेमींकडून टीकेची झोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 11:35 IST

सांडपाणी थेट गोदेत जात असल्याने नदीपात्रातील बायो ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण जवळपास 30 पेक्षा अधिक आहे.

नाशिक : नाशकातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मलनिस्सारण केंद्रे नावालाच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली आहे.शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार महापालिकेकडून आठ विभाग करण्यात आले आहेत. यातील चार विभागांतील मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असून, पाचवे केंद्रही लवकरच सुरू होणार आहे, तसेच सहाव्या केंद्र्राच्या उभारणीसाठी पिंपळगाव खांब येथे भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. सुरू असलेल्या चार केंद्रांची एकूण क्षमता ३४२.५० एमएलडी इतकी आहे. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता, पाणी तसेच नदीपात्रात सोडले जाते, असा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. सांडपाणी थेट गोदेत जात असल्याने नदीपात्रातील बायो ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण जवळपास 30 पेक्षा अधिक आहे. हे प्रमाण सुधारित निकषानुसार 10 असणे गरजेचे आहे. भुयारी गटार अन् पावसाळी गटारींचा गुंताजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिकेने शहरात भुयारी गटार आणि भुयारी पावसाळी गटार योजनेची कामे केली. ठिकठिकाणी भुयारी गटारी या थेट पावसाळी गटारीला जोडण्यात आलेल्या आहेत.पावसाळी गटारी थेट गोदावरीत सोडल्या आहेत. या गटारींमुळे पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणीही गोदापात्रात मिसळते. या गटारींचा गुंता सोडविण्याची सूचनाही निरीने महापालिकेला केली आहे. अद्याप हा गुंता सुटलेला नाही. अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी गरजेची : तपोवन, आगरटाकळी, पंचक, चेहडी, नांदूर दसक, गंगापूर याठिकाणी एसटीपी प्रकल्प कार्यान्वित आहेत. या एसटीपींची यंत्रणा जुनाट असून, ती आधुनिक करण्याची गरज आहे, तरच मलजलावर प्रक्रिया यशस्वी होऊन नदीपात्रात मिसळणारे पाणी प्रदूषणविरहित असेल, असे ‘निरी’चे म्हणणे आहे.  गोदेच्या खोऱ्यातील जमीन सुपीक मानली जाते. गोदावरीचे सर्वाधिक प्रदूषण सांडपाणी व औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक द्रव्येमिश्रित पाण्यामुळे होत आहे. त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यासह जलचर जैवविविधतेवर होत आहेत. - राजेश पंडित, याचिकाकर्ता 

टॅग्स :pollutionप्रदूषणgodavariगोदावरीNashikनाशिक