शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

विंचूर येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक

विंचूर : येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक उत्साहात पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप आटोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गावात शांतता राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलासह नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाडी वस्त्यांवरील गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सातव्या वर्षात गावपातळीवर ग्रामसुरक्षा दल स्थापना करण्यात आली आहे. या दलामुळे पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमक उपलब्ध झाली आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच गावात लक्ष्मी नांदेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंचक्रोशितील सरपंच व ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.परिसरात गणेशोत्सवासह आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व्हाव्यात यासाठी बैठका आयोजित केल्या जात आहेत. गावाच्या सुरक्षेसाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटातील युवकांचे ग्रामसुरक्षा दल कार्यरत ठेवल्यास चोऱ्या, लूटमार होणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन गावातील शांतता अबाधित ठेवा, असे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांना नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहितीपत्रके दिली. परिसरातील नागरिकांनी आपल्या गावातील समस्या पोलीस प्रशासनापुढे मांडल्या असता त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी संदीप आटोळे यांनी दिल्या. याप्रसंगी विंचूरचे सरपंच अविनाश दुसाने, विष्णूनगरचे सरपंच किशोर मवाळ, धारणगाव वीरचे पोलीस पाटील विजयकुमार गंभीरे, सरपंच ज्ञानेश्वर गंभीरे, देवगाव सरपंच सुरेंद्र अढांगळे, डोंगरगावचे सरपंच बन्सी नागरे, कानळद सरपंच तानाजी जाधव यांसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर.टी. तांदळकर, एल.के. धोक्रट, सूरज मेढे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रदीप तिपायले, विंचूर ग्रामपालिकेचे सदस्य देवीसिंग परदेशी, नीलेश गायकवाड, रणजीत गुंजाळ, महेंद्र पुंड, प्रकाश काळे, दीपक राऊत व परिसरातील ग्रामसुरक्षा दलाचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.