शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार

By admin | Updated: January 20, 2017 01:32 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : २७ फेब्रुवारीला वितरण

 नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना घोषित झाला आहे. मुंबई आणि नाशिक येथे प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली.कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून दिला जाणारा हा पुरस्कार वर्षाआड दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी विजया राजाध्यक्ष यांच्या नावावर निवड समितीने शिक्कामोर्तब केले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सन्मानपूर्वक विजया राज्याध्यक्ष यांचा गौरव केला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या तसेच मराठी भाषेतून गौरवास्पद लेखन करणाऱ्यास हा पुरस्कार दिला जातो. मुंबई येथे सतीश तांबे, दासू वैद्य, रेखा इनामदार साने, मोनिका गजेंद्र गडकर आणि अनुपमा उजगरे यांच्या निवड समितीने राजाध्यक्ष यांची निवड केल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे व विश्वस्त अरविंद ओढेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यापूर्वी जनस्थान पुरस्काराने विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आणि अरुण साधू यांना गौरविण्यात आले आहे. विजया राजाध्यक्ष या साहित्य वर्तुळात कथाकार आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. मीरज येथे जन्मलेल्या राजाध्यक्ष यांनी मुंबईत एल्फिस्टन महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून तर एसएनडीटी विद्यापीठात विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहे. कथाकार आणि समीक्षक म्हणून त्या ख्यातनाम असून त्यांचे अधांतर, विदेही, अनोळखी, अकल्पित, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तरल आणि काव्यात्मशैली ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये असून, समीक्षक या नात्यानेही त्यांची कामगिरी उल्लेखीय आहे. कवीतारती, जिव्हार स्वानंदाचे, आदिमाया, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध ही त्यांची समिक्षात्मक पुस्तके असून ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. सन २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.