शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:17 IST

पंचवटी : मोटार वाहन कायद्यानुसार वायूप्रदूषण केंद्रात वाहन तपासणी आॅनलाइन व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करून त्याची नोंद वाहन ४.० संगणकीय ...

पंचवटी : मोटार वाहन कायद्यानुसार वायूप्रदूषण केंद्रात वाहन तपासणी आॅनलाइन व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करून त्याची नोंद वाहन ४.० संगणकीय प्रणालीवर करणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.रस्त्यावर वाहन चालविताना वाहनासमवेत आरसीबुक, वाहन चालविण्याचा परवाना, इन्शुरन्स, तसेच वायूप्रदूषण प्रमाणपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात ५४ अधिकृत वायूप्रदूषण तपासणी केंद्रे आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वायूप्रदूषण तपासणी केंद्राचे कामकाज आॅनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ३४ वायूप्रदूषण तपासणी केंद्रांचे कामकाज आॅनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे, तर उर्वरित २० वायू तपासणी केंद्रांनी तत्काळ आॅनलाइन पद्धतीने करून त्याची नोंद ँ३३स्र:/५ंँंल्ल.स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल/स्र४ू यावर अद्ययावत करावी. नोंद करण्यासाठी दि.१ आॅक्टोबर २०१९ अंतिम तारीख आहे. यानंतर हस्तलिखित वायूप्रदूषण तपासणी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नसून सदर वाहन वायूप्रदूषण केंद्रांची मान्यता आपोआप रद्द होईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी दिली आहे. यापूर्वी वाहनधारकांना हस्तलिखित वायूप्रदूषण प्रमाणपत्र चालत होते. यापुढे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाहनधारकांना वायूप्रदूषण तपासणी आॅनलाइन पद्धतीने प्राप्त प्रमाणपत्र वाहन कागदपत्रे तपासणीत ग्राह्य धरली जाईल याची वाहनधारकांनी नोंद घेणे गरजेचे आहे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसonlineऑनलाइन