शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाला अनधिकृत पार्किंगचा विळखा

By admin | Updated: June 25, 2015 00:19 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : वाहनांना अडथळे; बंदोबस्त नसल्याचा परिणाम

नाशिक : सुमारे वर्षभरापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत न्यायालयाच्या भिंतीलगतची वाहनांची पार्किंग, तसेच अनधिकृत दुकाने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले होते़ मात्र, काही दिवसांपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने पुन्हा वाहनांची पार्किंग सुरू झाली आहे़ पोलीस आयुक्तांनी ही अनधिकृत पार्किंग हटवावी, तसेच आतील पार्किंगची व्यवस्था लावावी, अशी मागणी वकिलांकडून केली जात आहे़न्यायालयाच्या भिंतीलगत पूर्वी महापालिकेला ठेका देऊन पार्किंग सुरू केली होती़ तसेच या ठिकाणी असलेले चहावाले, विविध व्यावसायिक व बसथांबा यामुळे या ठिकाणी कायम गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत असे़ याबाबत वकिलांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांची बैठक घेऊन ही पार्किंग, बसथांबा व दुकाने हटविण्याचे आदेश दिले होते़या आदेशानुसार न्यायालया-बाहेरील पार्किंगचा ठेका मनपाने रद्द केला, तर पोलिसांनी या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढून पोलीस बंदोबस्त तैनात केला़ सुरुवातीचे काही दिवस या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला़ मात्र काही दिवसांनंतर तो काढून घेण्यात आल्याने न्यायालयाच्या भिंतीलगत पुन्हा वाहने उभी करण्यास सुरुवात झाली आहे़ याबरोबरच न्यायालयात जाणाऱ्या वाहनांची तपासणीही केली जात नसल्याचे समोर आले आहे़दरम्यान, प्रधान न्यायाधीशांच्या वाहनास अडथळा करणाऱ्या चारचाकी वाहनमालकाकडे न्यायालयीन पास नसल्याने हे वाहन न्यायालय आवारात कसे आले, त्यांच्याकडे पासची मागणी का करण्यात आली नाही, असे प्रश्न उपस्थित ज्येष्ठ वकिलांनी उपस्थित केले आहेत़ (प्रतिनिधी)