Two years ago, two of the gangs who looted Rs | ४ वर्षांपूर्वी १७ लाखांची लूट करणाऱ्या टोळीमधील दोघे ताब्यात

४ वर्षांपूर्वी १७ लाखांची लूट करणाऱ्या टोळीमधील दोघे ताब्यात

ठळक मुद्देदोघांना वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षानंतर अटक पोलीस मागावर; मात्र ते हुलकावणी देण्यास यशस्वी ठरत होते.

नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत १ जून २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास एका वाइनशॉपचालकावर हल्ला करून सुमारे १७ लाख ७६ हजार रूपयांची जबरी लूट संशयित दहा संशयित दरोडेखोर पसार झाले होते. या गुन्ह्यात ७ संशयितांना अटक करून न्यायालयात गुन्हे शाखा-१च्या पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. गुन्ह्यातील तीघे फरार होते, त्यापैकी दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने वडाळागाव, आडगावमधून सुमारे चार वर्षानंतर अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी खंडू लक्ष्मण शिरसाठ (४१) यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला करून जखमी करत त्यांच्याकडील सुमारे १७ लाख ७६ हजार रूपये लांबविले होते. या गुन्ह्यात दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी निष्पन्न करून दोन महिन्यानंतर गुन्ह्याची उकल करून ७ संशयित दरोडेखोरांना अटक केली होती. या गुन्ह्यात ३ दरोडेखोर तेव्हापासून आजतागायत फरार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते; मात्र ते हुलकावणी देण्यास यशस्वी ठरत होते. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे वडाळागावात एका पेट्रोलपंपाजवळ पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित अमजद सय्यद हा इसम पेट्रोलपंपाजवळ आला असता साध्या वेशातील पोलिसांनी त्याला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. यावेळी सहायक निरिक्षक पुष्पा निमसे, हवालदार कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, निलेश भोईर यांनी पाठलाग करून शिताफीने सय्यदच्या मुसक्या आवळल्या. त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा दुसरा फरार साथीदार रफिक शेख ऊर्फ सोनू याविषयी माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या अधारे पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने आडगाव वैद्यकिय महाविद्यालय चौफूलीच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सोनू हा त्या ठिकाणी आला असता पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याने सय्यदसह अन्य साथीदारासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिल्याचे वाघ यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास निमसे करीत आहेत.

Web Title: Two years ago, two of the gangs who looted Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.