शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

By admin | Updated: March 22, 2015 00:47 IST

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

पाळे खुर्द : दोन वर्षापासून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके न फिरल्याने कळवण तालुक्यातील विशेषत: पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, मार्च महिना संपत आला तरी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्याची ऊसतोड झालेली नाही. तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना सुरू असून कळवण तालुक्यातील उसाचे गाळप याच कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे. सदर कारखान्याची गाळप क्षमता कमी आहे. पश्चिम पट्ट्यात उसाचे आहे. त्यामुळे गाळप करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. तुटलेला ऊस लगेचच गाळपाला गेला तर कमी प्रमाणात घट येते. परंतु उसाची वाहतूक करण्यास विलंब होत असल्याने उसाच्या वजनात घट होते. त्याच बरोबर गुरासाठी मिळणारी हिरवी बांडी सुकली जाऊन तिचे पाचत यामुळे गुरांना खान्यासाठी हिरवी बांडी मिळत नाही. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा व तिरीप वाढल्याने ऊसतोड कामगाराच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम होऊन सरासरी दोन ते तीन दिवसांनी साधारणत: एक ट्रक भरेल इतकी ऊसतोड करून कारखान्याकडे रवाना होतो. त्यामुळे ऊसतोड कार्यक्रम संथ गतीने सुरू असून, त्याचा परिणाम हा शेतकरी जनजीवनावर होत आहे. (वार्ताहर)