शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुटीतही भोजनावर हजारो क्विंटल धान्य?

By admin | Updated: August 18, 2015 00:31 IST

आश्चर्य ! : एप्रिल-मेमध्ये झाला पुरवठा

नाशिक : शासकीय कारभार नेमका कोणत्या दिशेने व कसा सुरू असतो, याचे अनेक नमुनेदार आणि मासलेवाईक प्रसंग या ना त्या निमित्ताने समोर येत असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावरील एप्रिल-मेदरम्यान करण्यात आलेल्या धान्य पुरवठ्याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.वास्तविक पाहता एप्रिल- मे हा विद्यार्थ्यांच्या उन्हाळ सुटीचा कार्यकाळ असतो. त्या काळातही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो क्विंटल शिधा आणि धान्याचा पुरवठा करण्यात आल्याने सुटीत हे मध्यान्ह भोजन शिजविले कोणी आणि खाल्ले कोणी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्राथमिक शाळांना मध्यान्ह भोजनासाठी विविध प्रकारच्या नऊ धान्य व मसाल्यांचा पुरवठा करण्यात येतो. त्यात हळद, सोयाबीन तेल, मोहरी, जिरे, कांदा मसाला, मीठ, वाटाणा, चवळी आदि प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. एप्रिल, मे महिन्यात या नऊ प्रकारच्या धान्य व साहित्याचा पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ५,३७३ क्ंिवटल, तर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ३,८९४ क्ंिवटल धान्याचा पुरवठा करण्यात आल्याचे समजते. तसेच जून व जुलै दरम्यान पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ४,९१० व ३,३२४ क्ंिवटल नऊ प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला.तसे पाहिले तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना एप्रिल व मे च्या दरम्यान उन्हाळी सुटी होती, तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियमित शाळा सुरू झाल्यामुळे एप्रिल व मे दरम्यान करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाचे धान्य व साहित्य पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)