शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आढळली ५८ हजार डास उत्पत्ती स्थाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:58 IST

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी डेंग्यू संदर्भात नियुक्त केलेल्या कोअर टीमने आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीबरोबरच कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनपाकडून कार्यवाही सुरू : नोडल अधिकाऱ्यांच्या भेटी

नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी डेंग्यू संदर्भात नियुक्त केलेल्या कोअर टीमने आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीबरोबरच कारवाई करण्यात आली आहे.
शहरात आॅगस्ट महिन्यापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू लागली आणि आता डिसेंबर महिना उजाडला तरी रुग्ण संख्या वाढतच आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ६८ रुग्ण आढळले आहेत, तर जानेवारीपासून आत्तापर्यंत ९३९ रुग्ण आढळले आहे. आॅगस्ट महिन्यानंतर ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढली आहे. ते बघता यंदा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे.
महापालिकेने यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आढळली असून, ५८ हजार ८७५ डास उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. यात १ हजार ४५१ ठिकाणी डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर आत्तापर्यंत १४ हजार ३९१ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.
एकाच दिवसात केलेली कारवाई
बुधवारी (दि.११) एकाच दिवशी ६ हजार २९६ घरे तपासण्यात आली. त्यात ३५ ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. त्यातील पंचवीस पाण्याचे कंटेनर रिकामे करण्यात आले आहेत, तर उर्वरित ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात आली आहे. एकाच दिवसात २,७०१ ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांचा व्हॉट््सअ‍ॅप गु्रप
डेंग्यूचे उपचार होणाºया रु ग्णालयाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवण्यात आला असून, त्या माध्यमातून सर्व संबंधित डॉक्टरांकडून माहिती संकलित करणे, शासकीय मार्गदर्शक सूचना देणे, माहिती देणे, समन्वय साधण्याचे काम केले जात आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते आणि प्रभारी जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी बुधवारी विविध भागांत घरभेटी देताना दत्तजयंतीचे निमित्त साधून दत्तमंदिर असलेल्या सोसायट्यांच्या ठिकाणी भाविकांतदेखील जागृती केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य