शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्याजवळ दीड लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:45 IST

चांदवड : तालुक्यातील मंगरूळ टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर केबिनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देचांदवड : आयशरमधून केले लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील मंगरूळ टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर केबिनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.नवी मुंबई वाशी मार्केट येथे भाजीपाला विक्री करून परतणारे भडगाव तालुक्यातील कजगाव येथील चालक अशोक ठाणसिंग ठोके व विनोद अरविंद पाटील आयशर (क्र . एमएच १९ ००१९) उभी करून मंगरूळ टोल नाक्याजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी भाजीपाला विक्री केलेली रक्कम रुपये एक लाख ५२ हजार ५६१ त्यांनी पिशवीत ठेवलेली होती. जेवण करून परत आल्यानंतर सदरची पिशवी लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी हॉटेलमालकाकडे सीसीटीव्हीत तपासणी केली असता चोरट्याने त्यांच्या केबिनमध्ये मागील खिडकीचे कुलूप तोडून क्लिनर बाजूचा दरवाजा उघडून रोकड असलेली पिशवी चोरून नेली.आयशरचालक अशोक ठोके यांनी चांदवड पोलिसाततक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.वीजपंपाची चोरीसिन्नर : तालुक्यातील वडझिरे शिवारातील शेतकऱ्याचा १० हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरून नेल्याची घटना घडली. अंकुश छबू गिते यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. केएसबी कंपनीचा तीन हॉर्सपॉवरचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtollplazaटोलनाका