शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रस्ता बंद

By admin | Updated: July 3, 2016 22:39 IST

वडाळीनजीक : निफाड तहसील कार्यालयात ठिय्या

 निफाड : शेतकऱ्यांच्या वादामुळे एका शेतकऱ्याने चक्क शिवरस्त्यावर काटे व काचा टाकून हा रस्ताच बंद केल्याने विद्यार्थी व नागरिकांनी शनिवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडल्याने निफाड तहसील प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत हा शिवरस्ता मोकळा करून दिला़निफाड तालुक्यातील वडाळी नजीक, पिंपरी आणि अहेर वस्ती येथील रहिवाशांना निफाड कारखाना भाऊसाहेबनगर या ठिकाणी जाण्यासाठी असलेला रस्ता स्थानिक शेतकरी त्याच्या शेजारील शेतकऱ्याच्या वादातून रस्त्यावर काटे, दगड, काचा टाकून तीन महिन्यापासून मधून मधून बंद करीत होता़ सदर रास्ता मोकळा केल्याशिवाय आम्ही तहसील कार्यालय परिसर सोडणार नाही, अशी भूमिका उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी घेतली. विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या वतीने बाजीराव घोलप, नितीन अहेर, वाल्मीक घोलप, संदीप अहेर, रवि अहेर, संपत अहेर, दत्तू अहेर, आप्पा घोलप, प्रकाश घोलप, नंदू घोलप आदि उपस्थित होते. नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी लगेच याबाबत पालक आणि रस्ता बंद केलेल्या शेतकऱ्याला बोलावून घेतले. या रस्त्याच्या वादाची कागदपत्रे पाहून निर्णय घेऊ, तूर्तास रस्ता विद्यार्थ्यांना जायला मोकळा करा, असे आवाहन केले. परंतु हा अनेक दिवसांचा वाद असल्याने योग्य तो एकदाचा निर्णय लावा असा पवित्रा रस्ता बंद केलेल्या शेतकऱ्याने घेतला. विनोद भामरे, शांताराम पवार यांच्यासह पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, भाबड, सर्कल, तलाठी यांचे पथक प्रत्यक्ष भाऊसाहेबनगर येथील वादग्रस्त शिवरस्ता येथे दाखल झाले. मोजणी अधिकाऱ्यांनी या शिवरस्त्याची मोजणी केली. लगेच हा शिवरस्ता मोकळा केला़ चिमुकल्यांना शाळेत जायचा मार्ग मोकळा झाला़ (वार्ताहर)