शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कार अन् दुचाकीची नाशिकमध्ये समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

By अझहर शेख | Updated: April 2, 2024 15:07 IST

धडकेत दुचाकीवर बसलेला तत्सम राहुल पाटील या ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक: पाथर्डीफाटा-वडनेर रस्त्यावरून सुसाट कार व दुचाकी दामटविणाऱ्या दोन्ही वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (दि.१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवर बसलेला तत्सम राहुल पाटील (६) हा मुलगा ठार झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक आसिफ गुलाब शेख व दुचाकीचालक राहुल सिद्धार्थ पानपाटील या दोघांविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डीसर्कलकडून भरधाव जाणारी कार (एम.एच१५ डीएम १२३०) व पाथर्डीफाट्याकडून पाथर्डीसर्कलकडे जाणारी दुचाकी (एम.एच१५ एचएक्स २४३९) या वाहनांवरील वाहनचालक अनुक्रमे आसिफ व राहुल यांचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे दत्तमंदिराकडे डाव्या बाजुच्या वळणाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनांचा वेग इतका जास्त होता की कार, दुचाकींचे नुकसान होऊन दुचाकीवर बसलेला सहा वर्षाचा तत्सम रस्त्यावर बाजूला फेकला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून गंभीर स्वरूपात दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यास जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासून घोषित केले.

हा अपघात झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच आनंदनगर पोलिस चौकीचे सहायक उपनिरिक्षक रियाज शेख हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. याठिकाणी दोन्ही वाहने अपघातग्रस्त स्थितीत आढळून आली. शेख यांनी सरकारकडून फिर्यादी होत दोन्ही वाहनचालकांविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू