शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-राष्ट्रवादीत कडवी झुंज रंगण्याची चिन्हे

By admin | Updated: November 12, 2016 22:26 IST

भाजपा-राष्ट्रवादीत कडवी झुंज रंगण्याची चिन्हे

 नितीन बोरसे सटाणाशुक्रवारी अर्ज माघारीनंतर येथील पालिकेच्या सर्वच प्रभागातील तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकंदरीत सर्वच प्रभागांमध्ये अतितटीच्या लढती अपेक्षित आहेत. मुख्यत: भाजपा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा एक अपवाद वगळता पूर्ण पॅनल देण्याचा प्रयत्न केल्यामुळे या दोन तुल्यबळ पक्षांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कडवी झुंज होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पालिकेच्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे काही प्रभागातून श्री आणि सौ, पितापुत्र, नातेगोते, भाऊबंध निवडणूक रिंगणात उतरल्याने या लढती सर्वांसाठी लक्षवेधी ठरत आहेत. अशीच प्रभाग १ मधील लढत गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार संजय चव्हाण आणि त्यांचा परिवार राजकारणात केंद्रस्थानी आहे. स्वत: संजय चव्हाण माजी आमदार असून त्यांच्या सौभाग्यवती दीपिका विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या मातोश्री सुलोचना चव्हाण अडीच वर्षांपासून शहराच्या नगराध्यक्ष आहेत. मात्र सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी कितीही मिळाल्या तरी समाधान होत नाही हा मनुष्य प्राण्याचा गुणदोष आहे. याचे प्रत्यंतर शहराला दिसून येत आहे. आजपर्यंत राजकारणापासून अलिप्त असलेल्या संजय चव्हाण यांचे पिताश्री कांतीलाल चव्हाण यांनी वयाची सत्तरी पार करताना समाजसेवेची झूल बाजूला ठेवत राजकारणात उडी घेतली आहे.