शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

By admin | Updated: December 19, 2014 23:44 IST

सटाणा पालिकेची पाइपलाइन फुटली

ठेंगोडा : सटाणा नगर पालिकेची पाईपलाई फुटल्याने ठेंगोडा येथील गणेशनगर परिसरात गेल्या महिन्यांभरापासून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.या कडे संबंधीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.साधारणपणे तीन इंची पाइपच्या आकाराचे हे पाणी गेल्या महिनाभरापासून रात्रंदिवस सारखे वाहत आहे. सुरु वातीस कुण्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे पाणी असावे, असा कयास लावण्यात येत होता. संबंधित शेतकऱ्यांना माहिती झाल्यावर पाण्याचा विसर्ग थांबेल, असा अंदाज ग्रामस्थांमध्ये लावला जात होता. मात्र महिना उलटूनही सदर पाण्याचे लिकेज काढण्यास कुणीही पुढे न आल्याने हे पाणी नेमके कुणाचे याबाबत तर्क वितर्क केले जात होते. परिसरातील शेतकरी व सटाणा नगरपालिकेसही याबाबत कळविण्यात आले. मात्र सदर पाणी आपल्या पाइपलाइनचे नसल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पाणी वाहण्याचे थांबत नसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घरांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. २४ तास वीज केवळ सटाणा पालिकेचीच असल्याने हे पाणी सटाणा नगर पालिकेच्या पाईपलाईनचेच असल्याचा अंदाज बांधत ठेंगोडा ग्रामपंचायतीने संबंधित पाइपलाइनला बुच लावण्याचा इशारा देताच सटाणा नगरपालिकेने लिकेज काढले. परंतु थातूरमातूर उपाययोजना केल्याने रात्रीतून पाइपलाइन पुन्हा लिकेज होऊन हजारो लिटर पाणी वाहू लागले. सतत महिनाभरापासून वाहत असलेल्या या पाण्यामुळे परिसरातील मोकळ्या जागेवर पाणीच पाणी साचले आहे. त्याचबरोबर साचलेल्या पाण्यात परिसरातील मोकाट जनावरे - डुकरे मनसोक्त वावरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याची टंचाई व दुष्काळसदृश स्थिती असतानाही सटाणा पालिकेचे लिकेजकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ठेंगोडा ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)