परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:17 PM2019-11-16T17:17:09+5:302019-11-16T17:17:39+5:30

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीतील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे पाण्यात वाहून गेले, द्राक्ष पिकांवर डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून आला, मोठया प्रमाणावर गळ आणि कुज आली, सोयाबीनच्या दाण्यांना शेतातच मोड फुटले, मक्याच्या कणसाला अंकुर आले, टमाटे पिकाची वाताहत झाली, पालेभाज्या शेतातच सडून गेल्या, कोबी, फ्लॉवर खराब झाली जवळपास नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके आणि नगदी पिके यांची पुरती वाट लागली, त्यामुळे भरदार हंगामात परतीच्या पावसाने केला घात अस म्हणण्याची वेळ आली आहे

The return rains hit the farmer | परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा केला घात

परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा केला घात

Next
ठळक मुद्देसायखेडा : सत्तेच्या खुर्चीत भरपाईची परीक्षा कायम

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीतील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे पाण्यात वाहून गेले, द्राक्ष पिकांवर डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून आला, मोठया प्रमाणावर गळ आणि कुज आली, सोयाबीनच्या दाण्यांना शेतातच मोड फुटले, मक्याच्या कणसाला अंकुर आले, टमाटे पिकाची वाताहत झाली, पालेभाज्या शेतातच सडून गेल्या, कोबी, फ्लॉवर खराब झाली जवळपास नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके आणि नगदी पिके यांची पुरती वाट लागली, त्यामुळे भरदार हंगामात परतीच्या पावसाने केला घात अस म्हणण्याची वेळ आली आहे
जून महिन्यापासून यंदा चांगल्या पावसाला सुरवात झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भात, पालेभाज्या, कोबी,फ्लॉवर,टमाटे यासारखे पिकांची लागवड केली होती तीन महिने सलग चांगला पाऊस पडत राहिल्याने पिकांनी जोम धरला होता. अखेरच्या टप्प्यात पिके परीपक्वतेकडे झुकले असतांना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली पाऊस एक दोन दिवस येऊन उघडून गेला नाही, तर सलग चौदा दिवस काही भागात पंधरा दिवस ठाण मांडून राहिला, दिवसरात्र बेभान होऊन बरसणाºया पावसाने आठ दिवस सूर्य दर्शन झाले नाही की घरातून माणसांना बाहेर पडू दिले नाही.
जिथे माणसे, जनावरे जेरीस आले होते. तिथे कोवळ्या पिकांची काय गत असणार, पिके इतक्या दिवस पाण्यात भिजत राहिल्याने खराब झाली तर काही पिके पावसात अनेक रोगांना बळी पडली, रिमझिम तर कधी मूसळधार पाऊस पडला त्यामुळे पिके वाया गेली.
लाखो रु पये खर्च करून उभी केलेली पीक शेतकºयांच्या डोळ्यासमोर वाया जात असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले.
द्राक्षासारखे नगदी पीक लाखो रु पये भांडवलाचे आहे. पीक बहरले आणि काही दिवसात डोळ्यासमोर खराब झाली त्यामुळे शेतकºयांचा टाहो सरकार दरबारी पोहचला मात्र सत्तेच्या सरीपाटात राज्यकर्ते बळीराज्याच्या व्यथा विसरले, शासन दरबारी आवाज पोहचल्या नंतर भेटीना वेग आला भेटी झाल्या, पंचनाम्यांचे आदेश दिले गेले सरकारी बाबूनी आपली सेवा चोख बजावत पंचनामे पूर्ण केले शासनाला अहवाल सादर झाला.
राज्यात ९० लाख हेक्तर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम मिळणार किंवा कधी मिळणार हा चेंडू आत्ता राष्टÑपती राजवटीच्या अधिपत्यात येत आहे, त्यामुळे शेतकºयांया नजर राज्यपालानाच्या निर्णयाकडे लागून राहिली आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची वाट लागल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांनी नैराश्येतून अखेर बागांवर कुºहाड चालवली आहे. दहा वर्षे सांभाळलेल्या बागा ज्या हातांनी लावल्या, वाढवल्या मेहनतीच्या जोरावर आणि कर्जाच्या भांडवलावर डोलणाºया बागेवर स्वत:च्या हाताने कुºहाड चालवण्याची वेळ आली यापेक्षा मोठे दुर्दैव नसेल.

(फोटो १६ सायखेडा पाऊस)
अवकाळी पावसामुळे काढणी झालेले कांदे पाण्यावर तरंगले
 
Web Title: The return rains hit the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.