शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

निषेध : कामबंद आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नपालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: July 22, 2014 00:47 IST

निषेध : कामबंद आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नपालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नाशिक : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपालिका कामगारांनी सटाणा, मनमाड येथे मोर्चा काढून संबंधिताना निवेदन दिले. मागील सात दिवसांपासून या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे; मात्र त्याकडे शासनाने लक्ष न दिल्याने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सटाणा : सटाणा नगर परिषदेच्या कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवदेन दिले.सात दिवसांपासून सटाणा नगरपालिका कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवले असून, शासनाने दखल घ्यावी यासाठी आज कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून सिटू सलंग्न संघटनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार पोतदार यांना निवेदन देण्यात आले.आपल्या मागण्यांसाठी सिटू संलग्न कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून, उपोषणात अध्यक्ष सुभाष सोनवणे, दिनकर सोनवणे, पोपटराव सोनवणे, माधव मेणे, अनिल सोनवणे, सुनील सोनवणे, विजय सोनवणे, खंडू जाधव, हिरालाल कापडणीस, रामसिंंग पवार, सतीश सोनवणे, बाजीराव सोनवणे सहभागी झाले आहेत. मनमाड : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शहरातील कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवनावर झाला आहे.महाराष्ट्र रोजंदार नगरपालिका कर्मचारी कृती समिती, मुन्सिपल कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी संघटना (सिटू), रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भेट देऊन पाठिंबा दर्शवत आहेत.या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. मोर्चाचा समारोप एकात्मता चौकात करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून कर्मचाऱ्यांची भूमिका मांडली. मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्या महिलांनी काळी साडी परिधान करून तर पुरुषांनी काळे उपरणे खांद्यावर घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी रामदास पगारे, नितीन पाटील, किरण अहेर, दीपक धिवर, रवींद्र वाघेले, मनोज फटांगळे, प्रमोद सांगळे, गणेश गरुड यांच्यासह कर्मचारी व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)