शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटील भरतीची चौकशी

By admin | Updated: May 23, 2016 23:21 IST

दप्तर ताब्यात : तक्रारींची होणार खातरजमा

 नाशिक : निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील, कोतवाल भरतीत उघड उघड आर्थिक देवाण-घेवाणीचे झालेले आरोप, गुणवत्ताधारकांना डावलून दहावी उत्तीर्णांची लावलेली वर्णी, चेहरे पाहून केलेले गुणदान अशा विविध प्रकारच्या तक्रारी निफाड प्रांत अधिकाऱ्याच्या विरोधात प्राप्त झाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, भरती प्रक्रियेचे दप्तर व गुणदानाच्या पद्धतीबाबत माहिती मागविली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांनी एकत्र येत न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे. या साऱ्या गैरप्रकाराची जिल्हाधिकारी बाळकृष्णन् राधाकृष्णन् यांनी गंभीर दखल घेत अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना चौकशीचे आदेश दिले असून, पोलीसपाटील व कोतवाल भरतीबाबत उमेदवारांच्या दाखल झालेल्या तक्रारी व प्रत्यक्ष निफाड प्रांत अधिकाऱ्याने राबविलेली पद्धत या दोन्ही गोष्टी तपासून पाहण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविल्यानंतर करावयाच्या गुणदानाची पद्धत जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली असताना निफाड प्रांत अधिकाऱ्याने त्यात बदल केला किंबहुना गुण देण्याचा रकाना रिकामा ठेवल्याबाबतही उमेदवारांनी तक्रार केलेली आहे, त्या अनुषंगानेही गुणदान करताना नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला याचा उलगडा करण्यासाठी लेखी खुलासा मागविण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. गुणदानात करण्यात आलेले भेदाभेद व गुणवंतांना डावलण्याच्या प्रकाराच्या चौकशीसाठी संपूर्ण दप्तर मागविण्यात आले असून, त्याची दोन दिवसांत खातरजमा करण्यात आल्यावर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांवर खरोखरच अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी फेर प्रक्रिया राबविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला असून, यासंदर्भातील चौकशी पूर्ण होत नाही तोवर नियुक्ती देण्यावर स्थगिती देण्यात आल्याची माहितीही अपर जिल्हाधिकारी बगाटे यांनी दिली.