Pimpalgaon High School student first in Taluka level arts festival | तालुका स्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये पिंपळगाव हायस्कुलचा विद्यार्थी प्रथम
निफाड येथे तालुका स्तरीय घेण्यात आलेल्या कला उसत्व स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी व संगीत शिक्षक डी. आर. ढवळे, एम. डी. कतवारे, एस. एस. चौधरी, के. बी. जाधव आदी.

ठळक मुद्देत्याची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : माध्यमिक शिक्षण व शिक्षण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कलाउत्सव, संगीत गायन, वादन, नृत्य व चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत येथील पिंपळगाव हायस्कूलचा विद्यार्थी यश जगदीश जाधव याने वैयक्तिक नृत्य प्रकारात प्रथम क्र मांक मिळविला असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली.
या यशाबद्दल पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. जे. मोरे, उपमुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक एन. सी. जाधव, आर. के. बनकर, एम. आर. जाधव, एनसीसी अधिकारी नितीन डोखळे, आर. व्ही. साळवे आदीनी अभिनंदन केले. मार्गदर्शक म्हणून पिंपळगाव हायस्कूलचे संगीत शिक्षक डी. आर. ढवळे, एम. डी. कतवारे, एस. एस. चौधरी, के. बी. जाधव यांचे सहकार्य लाभले.


 


Web Title: Pimpalgaon High School student first in Taluka level arts festival
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.