नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आढावा बैठक येथे युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस गिरीश दाभाडकर व बाबुलाल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...
भारतात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याने वाहन उद्योगांवर संकट कोसळले आहे. हजारोंच्या संख्येने कामगार बेरोजगार होत आहेत. या आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यानु ...
येवला येथील रेल्वेस्थानक परिसरात लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यातून साखरेच्या गोण्या चोरणाºया दोन चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साखरेच्या ४६ गोण्या व एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. ...
भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. ...
शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवस ...
शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणे जेथे प्रवेश निषिद्ध असून, अशा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घूसखोरी करून मध्यरात्रीच्या सुमारास चंदनवृक्ष कापून लंपास करण्याच्या घटना मागील दोन महिन्यांमध्ये लागोपाठ घडल्याने पोलिसांनी चौघां चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण ...
श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे ...
तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने ईदगाह मैदान येथून रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे २५,००० भाविकांची वाहतूक केली. ...
जुने सीबीएस स्थानक परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढत असून, वृद्ध प्रवाशांना चोरटे ‘लक्ष्य’ करत असल्याचे वारंवार घटनांमधून समोर येत आहे. या परिसरात पुन्हा चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाचे ९० हजारांचे दागिने गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना घडली आहे. ...