Four Chandanchor arrested | चौघा चंदनचोरांना अटक
चौघा चंदनचोरांना अटक

ठळक मुद्दे२८ वृक्षांची कत्तल उघड

नाशिक : शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणे जेथे प्रवेश निषिद्ध असून, अशा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये घूसखोरी करून मध्यरात्रीच्या सुमारास चंदनवृक्ष कापून लंपास करण्याच्या घटना मागील दोन महिन्यांमध्ये लागोपाठ घडल्याने पोलीस चक्रावले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. गुन्हे शाखा युनिट-२ व सातपूर पोलीस ठाण्यांना तपासात यश आले आहे. पोलिसांनी चौघां चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये चंदन चोरट्यांनी १३ ठिकाणी चोरी करून २८ चंदन वृक्ष कापून लंपास केले आहेत. चंदनवृक्ष चोरीची सर्व ठिकाणे शहरातील अतिसंवेदनशील आहेत.


Web Title: Four Chandanchor arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.