पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 07:18 PM2019-12-02T19:18:01+5:302019-12-02T19:18:21+5:30

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याची नवी नोंद झाली.

Onion received highest rates in Pimpalgaon Basant Bazar Samiti | पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

Next
ठळक मुद्देउन्हाळी कांद्याला बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ११३०० रूपये प्रती क्विंटल असा दर

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याची नवी नोंद झाली.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (दि.२) उन्हाळी कांद्याला बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच ११३०० रूपये प्रती क्विंटल असा दर शेतकरी वर्गाला मिळाला हा बाजारभाव मिळालेला शेतकरी पंढरीनाथ बागुल लोहनेर ता. देवळा तालुक्यातील असुन कांद्याचे उत्पादन झालेली घट व लाल कांदाचे झालेले मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे कांदा शंभरी पार करून गेला आहे.
कांदा बाजार भाव मागिल वर्षी शेतकरी वर्गांनी सहा ते सात महिने साठवून ठेवलेल्या कांद्याला मागील वर्षी ८०० ते १३०० रूपये दर मिळत होता. अनेक आंदोलने केल्याने शासनाने दोनशे रु पये प्रति क्विंटल अनुदान दिले होते.
या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी कांद्याचे कमी उत्पन्न तसेच नविन लाल कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे कांद्याचे भाव अजून हि वाढणार असे चित्र आहे.
कांदा उत्पन्नाचा विचार केला असता, नाशिक जिल्हातील सध्या कांदा उत्पन्न हे केवळ विस ते पंचवीस हजार क्विंटल माल शेतकरी वर्ग कांदा विक्रि साठी आणत आहेत. भारतातील सामान्य ग्राहकांला सरासरी १० लाख टन कांदा रोज लागत असुन उत्पन्न अल्प झाल्याने सरासरी दोन महीने नविन पुन्हा लागवड केलेले लाल कांदा येईपर्यंत कांद्याला तेजी कायमच असणार आहे.
कांद्याचा मागील बाजार भावाचा विचार केला असता सन २०१३ साली कांदा ३० ते ४० रूपये किलो होता. २०१५ साली ३५ ते ४० रूपये दर मिळत होता. २०१७ साली ५५ ते ६० रूपये दर मिळत होता. परंतु हे दर फक्त आठ ते दहा दिवस शेतकरी वर्गाला मिळाले. त्यानंतर बाजार भावात घसरणच होत गेली.

माझ्या दहा बिगे क्षेत्रात लाल कांदा लावलेला होता. जास्त पावसाने ८० टक्के माल शेतातच सडला गेला. पाच ते सात क्विंटल माल सध्या मार्केटला विक्र ीसाठी आणला. तीस ते चाळीस हजार रूपये उत्पन्न मिळेल परंतु दोन लाख पर्यत कांद्याला खर्च झाला. आज लाल कांदा ७५ ते ८५ रूपये प्रती किलो जरी जात आहे, तरी पण हातातच कांदा नाही राहिला. उत्पन्न झाले असते तर सरासरी दर २० ते ३० रूपये मिळाला असता तरी परवडले असते.
- सुभाष शिंदे, शेतकरी.

आजचे बाजार भाव
उन्हाळी कांदा ९५ पासुन १३० रूपये किलो
लाल कांदा ७५ ते ८६ रूपये किलो

(फोटो ०२ मार्केट, ०२ सुभाष शिंदे)

Web Title: Onion received highest rates in Pimpalgaon Basant Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.