आजपासून लासलगाव येथील कांदा लिलाव पुर्ववत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:21 PM2020-10-29T23:21:31+5:302020-10-30T01:32:25+5:30
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती सौ.प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती सौ.प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर शुक्रवार, दि. 30.10.2020 पासुन कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सकाळी 09.00 ते 12.00 व दुपारी 03.30 ते लिलावाचे कामकाज संपेपर्यंत चालू राहतील. तसेच कांदा खादीचे लिलाव सकाळी 08.00 वाजता सुरू होतील. असे बाजूला समितीचे वतीने कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख 15 कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सलग चार दिवसांपासून बंद होते . कांद्याचे लिलाव बंद असल्यानं चार दिवसांत 100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
दिपावली सणाचे खरेदीकरीता हा कालावधी कांदा अगर शेतीमाल विक्रीकरीता महत्वाचा असतो. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती.
राष्ट्रीवादी पक्षाचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्या समवेत व्यापारी व शेतकरी यांनी बैठक घेतली.त्यानंतर कृषीमंत्री ना.दादासाहेब भुसे यांनी पुढाकार घेऊन मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांच्याकडे आज बैठक झाली.राज्य सरकारने कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचेबाबात केद्र सरकारीकडे मुख्यमंत्री लक्ष घालणार आहेत.सकारात्मक चर्चा झाल्याने गेली चार दिवस सुरू असलेली कांदा लिलाव.बंदची कोंडी सुटली आहे.