शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात दीड कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त

By admin | Updated: April 2, 2017 01:37 IST

रिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली

विजय मोरे नाशिकरिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली असून, दोन हजार २१९ गुन्हे नोंदवत एक हजार २८२ आरोपींना अटक करून एक कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़ याबरोबरच अवैध मद्याची वाहतूक करणारी ५७ वाहने जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती अधीक्षक आऱजी़ आवळ यांनी दिली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून दारू उत्पादनावर लक्ष ठेवणे व बेकायदा दारू विक्री, वाहतूक, बनावट मद्यनिर्मिती रोखण्याची तसेच कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे; मात्र या विभागाकडे कारवाई करण्यासाठी पुरेसे कर्मचारी व वाहनांची कमतरता आहे़; मात्र याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे़उत्पादन शुल्क विभागातील उपअधीक्षक पी़ एऩ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी महसुलात वाढ होत आहे़ उत्पादन शुल्क विभागाने २०१६-१७ या आर्थिक वर्षात बनावट विदेशी मद्य आणि हातभट्टी दारू उत्पादन प्रकरणी आतापर्यंत २ हजार २१९ गुन्हे दाखल करून १ हजार २८२ आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे़ यापैकी एक हजार २३९ गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडले असून, ९८० गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडलेले नाहीत़गतवर्षात अर्थात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत २ हजार १५० गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ९९८ गुन्हे बेवारस आहेत. १ हजार १५२ वारस गुन्ह्यांमध्ये म्हणजे ज्या छाप्याच्या कारवाईत आरोपी सापडले तेथून १ हजार १५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यावर्षात १ कोटी ३२ लाख ६ हजार २५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ तर २०१६ -२०१७ मध्ये १ कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यवाहतूक वा विक्री करणारी वाहने, हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे रसायन व साहित्य, स्पिरिट इत्यादि बाबींचा समावेश आहे. हातभट्टी दारूनिर्मिती बहुतांश नदी, ओढे, नाले, तसेच डोंगराळ, दुर्गम भागात अडचणीच्या ठिकाणी केली जात असल्याने अधिकारी व कर्मचारी पाहोचेपर्यंत आरोपी पळून गेलेले असतात. (प्रतिनिधी)